PM Modi Aligarh : राजाच्या नावाने विद्यापीठ उभारुन भाजपचा प्रजेला जिंकण्याचा प्रयत्न; काय आहेत राजकीय समीकरणे

उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

PM Modi Aligarh
पंतप्रधान मोदींचा जाट,ओबीसी, मुस्लिमांना जिंकण्याचा प्रयत्न  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान मोदींचा जाट,ओबीसी, मुस्लिमांना जिंकण्याचा प्रयत्न
  • शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपला मुस्लिम आणि जाट समीकरण हलके घ्यायचे नाही.
  • शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपची लोकप्रियता काही प्रमाणात कमी होत आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस प्रियांका गांधींचा चेहरा दाखवून विधान सभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं साांगितलं जात आहे. काँग्रेसने युपीच्या विधानसभेवर लक्ष केंद्रित करत अनेक दौरे देखील युपीमध्ये पक्ष श्रेष्ठींकडून केली जात आहेत. आता भाजपने आपली तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात मंगळवारी राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची पायाभरणी करताना पंतप्रधान मोदींनी केली आहे. देशात चालू असलेले शेतकरी आंदोलन, मुस्लीम विरोधी असलेली प्रतिमी हे भाजपला धोक्याची घंटा वाटत आहे. 

शेतकरी आंदोलनात मोठ्या संख्येने जाट समुदायची लोक आहेत. यामुळे जाट समुदायशी वैर करून भाजपला चालणार नाही. यामुळे राजा महेंद्र प्रताप सिंह यांचे योगदान पूढे करत भाजप जाट समुदायाला जवळ करण्याचा किंवा लुभवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्षाने कशाप्रकारे राजा महेंद्र प्रताप सिंह यांचे कार्य लोकांपुढे येऊ दिले नाही असं सांगत भाजपने शंभर जागा आपल्याा खिश्यात घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून संपूर्ण ओबीसी समाज आणि जाटांसह मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जाट राजाबद्दल बोलत असताना पीएम मोदींनी यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचाही उल्लेख केला.

अलीकडेच त्यांचे निधन झाले. पंतप्रधान म्हणाले, 'जेव्हा काही शुभ कार्य होते, तेव्हा आपण निश्चितपणे आपल्या पुर्वजांची आठवण ठेवतो. आज मला या पृथ्वीचे महान पुत्र स्व.कल्याण सिंह जी यांची अनुपस्थिती जाणवत आहे. कल्याणसिंह जी आज आमच्यासोबत असते, तर राजा महेंद्र प्रताप विद्यापीठ आणि अलिगढ संरक्षण क्षेत्रामध्ये उभारली जाणारी नवीन ओळख पाहून त्यांना खूप आनंद झाला असता. त्याचा आत्मा जिथे असेल तेथून ते आम्हाला आशीर्वाद देत असतील.' कल्याण सिंह अलिगढ जिल्ह्यातील अत्रौली तहसील मधौली गावचे रहिवासी होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपला मुस्लिम आणि जाट समीकरण हलके घ्यायचे नाही. भाजप जाट राजाच्या नावाने विद्यापीठ आणून 102 जागां आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जाट मतांचा प्रभाव असतो. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपची लोकप्रियता काही प्रमाणात कमी होत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, पश्चिम उत्तर प्रदेशातील 136 जागांपैकी भाजपने 102 जागा जिंकल्या, हा आकडा भाजपला कमकुवत करायला आवडणार नाही. येथे सुमारे 17 टक्के व्होट बँक जाटांची आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भाजपच्या या व्होट बँकेवर वाईट परिणाम झाला आहे.

कल्याण सिंह यांचा उल्लेख का? समजून घ्या 

जाट राजा महेंद्र प्रताप सिंह याची चर्चा होत असताना पंतप्रघान मोदींनी अचानकपणे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची आठवण नाही केली. वास्तविक, कल्याण सिंह हे भाजपच्या हिंदुत्वाचा सर्वात मोठा चेहरा होते. काही महिन्यांनंतर, यूपी निवडणुका आहेत त्या जिंकण्यासाठी, भाजपला ओबीसी मतांमध्ये देखील प्रवेश करणे आवश्यक आहेकल्याण सिंह हे ओबीसी समाजातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री असल्याचे सांगितले जाते.

कल्याण सिंह हे लोधी समुदायाचे होते, ज्यांची लोकसंख्या मध्य उत्तर प्रदेश ते पश्चिम यूपी पर्यंत पसरलेली आहे. मागासांच्या लोकसंख्येत या समाजाची संख्या यादव आणि कुर्मींनंतर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले जाते.   जरी यादवांची मते सपा आणि दलितांची मते बसपाची असतात. पण भाजप प्रयत्न करेल की ओबीसीमधील इतर घटक वर्ग देखील आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. भाजपने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवाद आणि हिंदुत्वला पुढे करत या गटातील लोकांची मते मिळवून सर्वांना धक्का दिला आहे. वास्तविक, पूर्वी भाजपवर मध्यवर्गीय आणि ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा आरोप होता. पण निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वाधिक ओबीसी व्होट बँकेवर लक्ष केंद्रित केले आहे.


यूपीचे जातीचे गणित समजून घ्या 

  • सर्वाधिक 40 टक्के ओबीसी आहेत.
  • दलितांची लोकसंख्या 20.8% आहे 
  • तिसऱ्या क्रमांकावर असलेले मुस्लिम 19 टक्के आहेत.
  • 12 टक्के ब्राह्मण लोकसंख्या
  • ठाकूर 8 टक्के आहेत

या आकडेवारी सहज लक्षात येते की, भाजप उगाच नाही ओबीसी समाजाला आपल्या जवळ करत आहे. 
ज्यावेळी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, डिझेल-पेट्रोलचे दर गगनाला भिडत आहेत, विरोधक महागाईला मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण संसाधने वापरण्यात आली आहेत. त्यात मोदींनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या घोषवाक्यासह सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अलीगढमध्येही, जेव्हा ते बोलू लागले, तेव्हा अनेक पक्षांमध्ये खलबली सुरू झाली. 

होय, सपा-बसपा किंवा मुस्लीम मतांच्या आधारे उत्तर प्रदेशात निवडणुका लढवण्यासाठी आलेल्या ओवेसींचा पक्ष मोदींच्या भाषणाचा अर्थ काढत असतील. आपल्या वडिलांच्या मुस्लिम मित्राची कथा सांगून, पंतप्रधानांनी अलीगढच्या मुस्लिमांनाच नव्हे तर राज्यातील मुस्लिमांनाही संदेश देण्याचा प्रयत्न केला की, भाजप जे काही करत आहे ते संपूर्ण समाजाच्या हितासाठी काम करत आहे. 

मुस्लिम मेहरबानचा किस्सा

मोदींनी सांगितले की आतापर्यंत लोक त्यांच्या घराच्या किंवा त्यांच्या दुकानाच्या सुरक्षेसाठी अलीगढवर अवलंबून असत. कारण अलीगढचा कुलूप लागले की, लोक निश्चिंत होत असतं. यावेळी मोदींनी लहानपणीची गोष्ट सांगितली. ही गोष्टी साधरण 55-60 वर्ष जुनी आहे. आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा अलिगढच्या कुलूपसाठी एक मुस्लीम मेहरबान विक्रेता होता. ते प्रत्येत तीन महिन्यांनी आमच्या गावात येतं. मला अजूनही आठवते की ते काळ्या रंगाचे जाकीट घालायचे आणि सेल्समन म्हणून ते दुकानात कुलूप ठेवून जायचे आणि तीन महिन्यांनी ते येऊन पैसे घ्यायचे. ते गावाच्या आसपासच्या व्यापाऱ्यांनाही कुलूप देत असतं.

पंतप्रधानांनी सांगितले की मुस्लिम मेहरबान आणि त्याच्या वडिलांशी चांगली मैत्री होती. तो यायचा तेव्हा तो आमच्या गावात 4-6 दिवस राहायचे. तो दिवसा जे पैसे आणायचे तो माझ्या वडिलांकडे द्यायचे आणि माझे वडील ते ठेवायचे.  नंतर, जेव्हा तो निघायचा, तेव्हा तो माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ट्रेनने परत यायचे. माझ्या लहानपणी, यूपीची दोन शहरे खूप परिचित होती.  एक सीतापूर आणि दुसरा अलीगढ. मागे, जर आपण यूपीच्या निवडणुकांकडे जातीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांशी मागच्या बाजूने जोडण्याचे सोशल इंजीनियरिंग 2017 च्या निवडणूक प्रचारातही दिसून आले. यामध्ये कल्याणसिंहांचे तेच सूत्र अवलंबण्यात आले.आज CM योगी सुद्धा पूर्ण फॉर्म मध्ये दिसले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी