Lalu Yadav Health : लालू यादव यांच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून पीएम मोदींनी व्यक्त केल्या सदिच्छा

PM Modi calls Tejashwi Yadav, inquires about RJD supremo Lalu Prasad health, Lalu Yadav Health News : राष्ट्रीय जनता दल (आरजेडी / राजद) पक्षाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव आजारी आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे.

PM Modi calls Tejashwi Yadav, inquires about RJD supremo Lalu Prasad health, Lalu Yadav Health News
Lalu Yadav Health : लालू यादव यांच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून पीएम मोदींनी व्यक्त केल्या सदिच्छा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • लालू यादव पारस हॉस्पिटलच्या ICUमध्ये दाखल
  • लालू यादव यांच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून पीएम मोदींनी व्यक्त केल्या सदिच्छा
  • श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे लालू यादव यांना कृत्रिमरित्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरू

PM Modi calls Tejashwi Yadav, inquires about RJD supremo Lalu Prasad health, Lalu Yadav Health News : राष्ट्रीय जनता दल (आरजेडी / राजद) पक्षाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव आजारी आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे. लालू यादव यांना पाटणा येथील पारस हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी फोन करून तेजस्वी यादव यांच्याकडे लालू यादव यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी यांनी लालू यादव यांच्या तब्येतीला लवकर आराम पडावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

लालू यादव बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी वास्तव्यास आहेत. तिथेच रविवार ३ जुलै २०२२ रोजी पायऱ्यांवरून पडल्यामुळे लालू यादव यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले आणि पाठीला दुखापत झाली. लालू यादव यांना आधीपासूनच मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. यामुळे पायऱ्यांवरून पडल्यानंतर लालू यादव यांची तब्येत पुन्हा ढासळली. सध्या लालू यादव पारस हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे लालू यादव यांना कृत्रिमरित्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे. 

भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी लालू यादव यांच्या तब्येतीला लवकर आराम पडावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच आवश्यकता भासल्यास लालू यादव यांना दिल्लीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, असे सुचवले. 

लालू यादव यांची मुलगी रोहिणी हिने लालू यादव यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोत लालू यादव यांना कृत्रिमरित्या ऑक्सिजन दिला जात असल्याचे दिसत आहे. रोहिणी यांनी ट्वीटमध्ये 'माय हिरो, माय बॅकबोन पापा, गेट वेल सून,  हर बाधाओं से जिसने पाई है मुक्ति, करोड़ों लोगों की दुआएं हैं जिनकी शक्ति' असे ट्वीट केले आहे.

राष्ट्रीय जनता दल पक्षाचा २६वा स्थापना दिवस मंगळवार ५ जुलै २०२२ रोजी साजरा होणार होता. मात्र लालू यादव यांची तब्येत ढासळल्यामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला. सोमवार ४ जुलै २०२२ पासून लालू यादव यांचे मुलगे तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव हे पारस हॉस्पिटलमध्ये आहेत. लालू यादव यांच्यावर उपचार करणाऱ्या मेडिकल टीमच्या संपर्कात आहेत. 

इतर रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून लालू यादव यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येऊ नका. तब्येतीबाबत वेळोवेळी माहिती दिली जाईल; असा संदेश देणारा व्हिडीओ तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी