Narendra Modi DP: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi)यांनी मंगळवारी त्यांच्या सर्व सोशल मीडिया (Social Media) पेजेसचा डीपी (Profile Photo) बदलला आहे. त्यांनी डीपीमध्ये तिरंग्याचा (Tiranga) फोटो लावला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी लोकांना त्यांच्या सोशल मीडिया पेजच्या डीपीमध्ये तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. (pm modi changed dp of all his social media accounts made some appeal to people of india har ghar tiranga abhiyan)
एका ट्विटमध्ये पीएम म्हणाले की, '2 ऑगस्ट हा खास दिवस आहे. ज्या वेळी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि देश तिरंगा मोहिमेशी जोडून घेण्यासाठी उत्साही आहे, अशा वेळी आपल्याला आपल्या तिरंग्यासाठी जनआंदोलन साजरा करण्याची गरज आहे. मी माझ्या सर्व सोशल मीडिया अकाउंटचे डीपी बदलले आहेत. मी तुम्हालाही असेच आवाहन करतो.'
अधिक वाचा: Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहीम, PM मोदींचे ट्वीट
रविवारी त्यांच्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधानांनी लोकांना आवाहनही केले. ते म्हणाले की, 'हर घर तिरंगा' अभियान 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभरात सण म्हणून साजरे केले जाईल. लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ते म्हणाले, 'तिरंगा आपल्याला एकत्र आणतो आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो.' पंतप्रधानांनी लोकांना 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर राष्ट्रध्वजाचे चित्र टाकण्याचे आवाहन केले आहे.
२ ऑगस्ट रोजी पिंगली व्यंकय्या यांचा जन्म दिवस
तिरंग्यासाठी 2 ऑगस्टच्या दिवसाचेही ऐतिहासिक महत्त्व असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या दिवशी राष्ट्रध्वजाची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांचा जन्म झाला होता. त्यामुळेच तिरंग्याचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकून व्यंकय्या यांचा आदर करावा असं पंतप्रधाना मोदी म्हणाले होते. यावेळी पंतप्रधानांनी तिरंग्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मॅडम कामा (भिकाजी रुस्तम कामा) यांच्याबद्दलही मोदींनी चर्चा केली.
25 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्याची तयारी
येत्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मरणार्थ देशभरात 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. या विशेष सोहळ्यासाठी सरकारनेही विशेष तयारी केली आहे. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत सरकार सुमारे 25 कोटी घरांवर तिरंगा फडकवणार आहे.
अधिक वाचा: National Flag: जगातील सर्वात मोठा तिरंगा दिल्लीत फडकणार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा
सरकारचे हे अभियान सांस्कृतिक मंत्रालय आणि राज्ये पुढे नेत आहेत. तिरंगा बनवणाऱ्या संस्था आणि कंपन्या रात्रंदिवस राष्ट्रध्वज बनवण्यात मग्न आहेत.