pm modi gujarat visit, पावागड शक्तिपीठ महाकाली मंदिरावर शेकडो वर्षांनी ध्वजारोहण, पीएम मोदी करणार ध्वजारोहण

pm modi gujarat visit, flag will be hoisted at mahakali temple of pavagadh after centuries by modi : पावागड : गुजरातमध्ये पावागड येथे शक्तिपीठ आहे. पावागड येथे महाकाली मंदिर आहे. या मंदिरावर शेकडो वर्षांपासून शिखर अर्थात कळस नसल्यामुळे मंदिरावर असणारा धर्मध्वज पण नव्हता. आता ही परिस्थिती बदलणार आहे.

pm modi gujarat visit, flag will be hoisted at mahakali temple of pavagadh after centuries by modi
पावागड शक्तिपीठ महाकाली मंदिरावर शेकडो वर्षांनी ध्वजारोहण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पावागड शक्तिपीठ महाकाली मंदिरावर शेकडो वर्षांनी ध्वजारोहण
  • पीएम मोदी करणार ध्वजारोहण
  • नव्या मंदिरावर सोन्याचा कळस

pm modi gujarat visit, flag will be hoisted at mahakali temple of pavagadh after centuries by modi : पावागड : गुजरातमध्ये बडोद्यापासून ४६ किमी दूर पावागड येथे शक्तिपीठ आहे. पावागड येथे महाकाली मंदिर आहे. या मंदिरावर शेकडो वर्षांपासून शिखर अर्थात कळस नसल्यामुळे मंदिरावर असणारा धर्मध्वज पण नव्हता. आता ही परिस्थिती बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पावागड येथील महाकाली मंदिरावर ध्वजारोहण होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार १८ जून २०२२ रोजी होणार आहे. 

(पावागडचे नवे मंदिर)

पावागड येथील महाकाली मंदिराच्या कळसाच्या जागेजवळ असलेली दर्गा हटविण्यात आली आहे. मंदिरापासून दूर एका कोपऱ्यात दर्गा स्थलांतरित करण्यात आली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. 

(पावागडचे जुने मंदिर)

पावागडचे शक्तिपीठ उंच डोंगरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आता पायथ्यापासून सुरुवातीच्या पाच किमी पर्यंत उत्तम रस्ता आहे. यानंतर सुमारे अडीच हजार पायऱ्या आणि रोप वे असे दोन पर्याय आहेत. अंतिम टप्प्यात तीनशे पायऱ्या सर्व भाविकांना चढून जाव्या लागतात. ज्यांना काही कारणाने चालणे शक्य नाही अशा भाविकांना पालखीतून अथवा पिठ्ठू म्हणजे एखाद्या स्थानिकाच्या पाठीवरून तीनशे पायऱ्या पार करता येतात.

मुघलांनी पावागड येथील महाकाली मंदिरावर सोळाव्या शतकात हल्ला केला होता. मोहम्मद बेगडा याने १५४० मध्ये महाकाली मंदिराचा कळस तोडला. यानंतर मंदिराच्या मागील बाजूस उंच आणि कळसाच्या जागेजवळ येईल अशा पद्धतीने एक दर्गा बांधली. या दर्गामुळे पावागड मंदिरावर कळस पुन्हा तयार करणे कठीण झाले. कळस नसल्यामुळे मंदिराच्या कळसावरील धर्मध्वज फडकाविणेही कठीण झाले.

अखेर पावागड येथील मंदिरामागच्या दर्गाचा प्रश्न सुटला. परस्पर सामंजस्यातून तोडगा काढण्यात आला. दर्गा पर्यायी जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. यानंतर संपूर्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय झाला. नव्या मंदिरावर सोन्याचा कळस आहे. याच मंदिरावर धर्मध्वजाचे ध्वजारोहण शनिवार १८ जून २०२२ रोजी होणार आहे. हे ध्वजारोहण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. 

मंदिरावर ध्वजारोहण करण्याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये घरी जाऊन त्यांच्या आईची अर्थात हिराबेन यांची भेट घेणार आहेत. हिराबेन शंभरावा वाढदिवस साजरा करणार आहेत. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडेल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पालनपुर ते मदार या फक्त मालवाहतुकीसाठी तयार केलेल्या विशेष रेल्वे मार्गाचे लोकार्पण करणार आहेत. अहमदाबाद-बोटाद रेल्वे गेज परिवर्तन झाल्यानंतरच्या पहिल्या ट्रेनला पंतप्रधान हिरवा सिग्नल दाखवणार आहेत. लूनिधर ते ढासा आणि पालनपुर ते राधनपुर या दोन पॅसेंजर गाड्यांना पंतप्रधान मोदी हिरवा सिग्नल दाखवणार आहेत. तसेच पंतप्रधान विजापुर-अंबलियासन, नडियाद-पेटलाड, कडी-कटोसन, अदाराज मोती-विजापुर, जंबुसर-सामानी, पेटलाड-भद्रन आणि हिम्मतनगर-खेडब्रह्मा या रेल्वे मार्ग परिवर्तन प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. 

मोदी पहिल्यांदा पावागडला दर्शनासाठी जाणार

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पावागड प्रश्न कोर्टात होता. अखेर या विषयात परस्पर सामंजस्यातून कोर्टाबाहेर तोडगा काढण्यात आला. पावागडचा प्रश्न सुटला नव्हता म्हणून मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी दर्शनासाठी पावागडवर जाणे टाळले होते. आता पहिल्यांदाच ते पावागड येथे जाणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी