PM Modi in Kedarnath :पंतप्रधान मोदींनी केलं आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण, काही वेळात सुरू होईल भाषण

PM Modi to unveil statue of Guru Shankaracharya : पंतप्रधान झाल्यानंतर आज पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) ५व्यांदा केदारनाथ (Kedarnath) दौऱ्यावर आहेत.

PM Modi unveiling of Statue of Shankaracharya
पंतप्रधान मोदींनी केलं आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण  |  फोटो सौजन्य: Twitter

PM Modi to unveil statue of Guru Shankaracharya : पंतप्रधान झाल्यानंतर आज पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) ५व्यांदा केदारनाथ (Kedarnath) दौऱ्यावर आहेत. पहिल्या कार्यकाळात ते चार वेळा केदारनाथला गेले होते. दुसऱ्या टर्ममधील त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शंकराचार्यांच्या प्रतिमेचे (Shankaracharya Statue) अनावरण केलं आहे. 
केदारनाथमध्ये शंकराचार्यांची 12 फूट उंच आणि 35 टन वजनाची मूर्ती बसवण्यात आली आहे.

याशिवाय 2013 च्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शंकराचार्यांच्या समाधी स्थळाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. बाबा केदारनाथला  भेट देण्यासोबतच पंतप्रधान मोदी केदारनाथमध्ये 400 कोटी रुपयांहून अधिक कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधानांच्या आगमनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी केदारनाथला भेट दिली होती. 
पीएम मोदींच्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

मंचावर कार्यक्रम सुरू झाला असून या कार्यक्रमात उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाषण केले आहे. थोड्याच वेळात केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होणार आहे. (सविस्तर वृत्त लवकर)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी