नवी दिल्ली : पंतप्रधान (Prime Minister ) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधान संग्रहालय (Prime Museum) राष्ट्राला समर्पित केले. संग्रहालयात (Museum) प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी स्वतः तिकीट काढले आणि त्यानंतर प्रवेश घेतला. या म्युझियमचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व पंतप्रधानांना जागा देण्यात आली आहे. या संग्रहालयाला ज्याला पंतप्रधानांचे संग्रहालय म्हणूनही ओळखले जाते.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दरम्यान हे संग्रहालय आपल्या पंतप्रधानांचे जीवन आणि योगदान याद्वारे स्वातंत्र्योत्तर भारताची कथा सांगणार आहे. देशाच्या निर्माणासाठी भारतातील सर्व पंतप्रधानांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीकोनात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संग्रहालय बनविण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पंतप्रधान भले कोणत्याही विचारधाराचे असेल किंवा दुसऱ्या पक्षाचे असो, या सर्वांना येथे जागा देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सर्वसमावेशक प्रयत्न आहे, ज्याचा उद्देश तरुण पिढीला आपल्या सर्व पंतप्रधानांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि उपलब्धी याविषयी जागरुकता आणि प्रेरणा देणे हा आहे.
नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, या संग्रहालयाचे काम सुरू आहे. ते म्हणाले की आमच्या शेवटच्या गॅलरीत डॉ.मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ दाखवण्यात आला आहे. अलीकडीलच्या कामकाजाचा कार्यकाळ (2014 पासून पंतप्रधान मोदींचा) देखील लवकरच तयार केला जाईल.