PM Narendra Modi Jacket: प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकल करुन बनवलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जॅकेट, वाचा सविस्तर

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 08, 2023 | 17:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असतात. खरतरं त्यांचे कपडे नेहमीच काहीना काही संदेश देत असतात. जिकडे जातील तेथील परिसराप्रमाणे मोदी आपले कपडे निवडतात.

PM Modi's jacket is made from plastic batt, know in detail.
PM Narendra Modi Jacket:प्लास्टिक बॅाटल पासून तयार केला आहे पीएम मोदी यांचं जॅकेट, जाणून घ्या सविस्तर.  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  •  खास प्लास्टिक बॅाटलपासून बनवलं होतं जॅकेट
  • पर्यावरणासाठी अगदी अनुकूल 
  • जॅकेट बनवण्यासाठी सरासरी 15 बॅाटल वापरल्या जातात

PM Narendra Modi Jacket: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असतात. खरतरं त्यांचे कपडे नेहमीच काहीना काही संदेश देत असतात. ते जिकडे जातील तिकडच्या परिसराप्रमाणे ते आपले कपडे निवडतात आणि त्यांच्या कपड्यांमध्ये एक खास कलालारी केलेली असते. अशातच पुन्हा एकदा त्यांचं जॅकेट चर्चेत आलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोहोचले आणि त्या दरम्यान त्यांनी खास जॅकेट परिधान केले होते. नरेंद्र मोदी संसदेत निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसून आले.

अधिक वाचा: RBI ने रेपो रेट वाढवला, कार, होम लोन पुन्हा महागणार

खास प्लास्टिक बॅाटलपासून बनवलं होतं जॅकेट
 
अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान पीएम मोदी संसंदेत जे जॅकेट घालून पोहोचले होते ते जॅकेट 28 प्लास्टिक बॉटलपासून तयार केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीकचा शुभारंभ केला. यावेळी इंडियन ऑईलने (Indian Oil) प्लास्टिक बॅाटलला रिसायकल करून तयार केलेला जॅकेट भेट म्हणून दिले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन दरवर्षी 10 कोटी बॅाटल रिसायकल करेल, ज्याने सशस्त्र दलांसाठी गणवेशही तयार केला जाईल.

पर्यावरणासाठी अगदी अनुकूल 

आयओसीने मोदींना जे जॅकेट भेट म्हणून दिले त्यासाठीचा कपडा तमिळनाडूतील करूर कंपनी रेंगा पीलीमर्स यांनी बनवलं आहे. प्लास्टिक बॉटलपासून बनवलेल्या कपड्यांची एक खासियत अशी की, याला कलर करण्यासाठी एक थेंबही पाण्याची गरज लागली नाही. जॅकेट बनवण्यासाठी सरासरी 15 बॅाटल वापरल्या जातात. टी-शर्ट आणि शॉर्ट्स बनवण्यासाठी 5 ते 6 बॅाटल वापरल्या जातात. याचप्रकारे शर्ट बनवण्यासाठी 10 आणि पँन्ट बनवण्यासाठी 20 बॉटलचा वापर केला जातो. इंडियन ऑईलने गुजरातमध्ये पंतप्रधानांच्या टेलरकडून हे जॅकेट तयार करून घेतले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी