Jewar Airport Inauguration पंतप्रधान मोदींच्या हस्ते नोएडाच्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी

PM Modi Lays Foundation Stone For Noida International Airport पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमधील पाचव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी झाली. नोएडा येथे असलेल्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

PM Modi Lays Foundation Stone For Noida International Airport
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नोएडाच्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी 
थोडं पण कामाचं
 • पंतप्रधान मोदींच्या हस्ते नोएडाच्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी
 • विमानतळ सप्टेंबर २०२४ पासून सुरू करण्याचे लक्ष्य
 • भारतातील पहिल्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमानतळ

PM Modi Lays Foundation Stone For Noida International Airport नोएडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमधील पाचव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी झाली. नोएडा येथे असलेल्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा विमानतळ सप्टेंबर २०२४ पासून सुरू करण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवण्यात आले आहे. विमानतळाची निर्मिती ज्यूरिख एयरपोर्ट इंटरनॅशनल ही कंपनी करणार आहे. जेवर विमानतळाच्या निर्मितीसाठी २९ हजार ६५० कोटी रुपयांचा खर्च करण्याची तरतूद केली आहे.

नोएडातील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्ये - 

 1. भारतातील पहिल्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमानतळ
 2. प्रकल्पाचा खर्च - २९ हजार ६५० कोटी रुपये
 3. एकाचवेळी १७८ विमानं पार्क करण्याची व्यवस्था
 4. सप्टेंबर २०२४ पासून विमान वाहतूक सुरू होणार आणि विमानतळ कार्यरत होणार
 5. विमानतळाचा परिसर ५८४५ हेक्टरचा आहे
 6. पहिल्या टप्प्यात १३३४ हेक्टर परिसरात बांधकाम होईल
 7. पहिल्या टप्प्यात दोन प्रवासी टर्मिनल आणि दोन धावपट्ट्यांची निर्मिती केली जाईल
 8. जेवर विमानतळावर एकूण पाच धावपट्ट्या असतील
 9. पूर्ण क्षमतेने कार्यरत होताच भारतातील पहिल्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमानतळ होणार
 10. फ्लोरिडाचा ऑरलँड विमानतळ सध्या जगातील सर्वात मोठा चौथ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. जेवर विमानतळ कार्यरत होताच ऑरलँड विमानतळ पाचव्या क्रमांकावर ढकलला जाईल.
 11. पहिल्या वर्षात जेवर विमानतळावरुन ४० लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे
 12. जेवर विमानतळावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या २०२५-२६ पर्यंत (वार्षिक) १७ लाख या टप्प्यावर पोहोचेल असा अंदाज आहे
 13. दरवर्षी प्रवासी संख्या वाढेल आणि २०४४ पर्यंत जेवर विमानतळावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या (वार्षिक) आठ कोटींचा टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे
 14. जेवर विमानतळावरुन सुरुवातीला मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या मार्गांसाठी आठ विमानांची वाहतूक होईल नंतर विमान वाहतुकीचे प्रमाण वाढेल
 15. जेवर विमानतळ चार एक्सप्रेस वे, मेट्रो, बुलेट ट्रेन, पेड टॅक्सी यांच्याशी जोडला जाईल. यामुळे विमानतळावर येणे तसेच विमानतळावरुन घरी अथवा कामाच्या ठिकाणी जाणे सोपे होईल
 16. मेट्रो आणि बुलेट ट्रेनचे स्टेशन विमानतळाच्या टर्मिनलमध्येच तयार केले जाईल यामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी