हा नवा भारत आहे; येथे आडनावाला महत्त्व नाही, तरूणांच्या क्षमतेला महत्त्वः पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सतत बदल होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. मोदींनी म्हटलं की, कधीकाळी संपर्क आणि आडनावामुळे संधीचे दरवाजे उघडायचे, पर आताच्या नव्या भारतात तरूणांची क्षमता महत्त्वपूर्ण आहे.

PM Modi
हा नवा भारत आहे; येथे आडनावाला महत्त्व नाही:पंतप्रधान मोदी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केलं.
  • पंतप्रधान मोदींनी नवा भारत या विषयावर आपलं मत व्यक्त केलं.
  • नव्या भारतात आडनावाला महत्त्व नसून आपलं नाव सिद्ध करण्यासाठी तरूणांची क्षमता महत्त्वपूर्ण ठरते- पंतप्रधान मोदी

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवा भारत या विषयावर आपलं मत व्यक्त केलं. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी म्हटलं की, नव्या भारतात आडनावाला महत्त्व नसून आपलं नाव सिद्ध करण्यासाठी तरूणांची क्षमता महत्त्वपूर्ण ठरते. मोदी पुढे म्हणाले की,  नव्या भारतात चांगल्यासाठी गोष्टी बदलत आहेत आणि भ्रष्टाचाराला कोणतंही स्थान नाही आहे. लोकं आणि संघटनांमध्ये संवाद होणं आवश्यक आहे, जरी त्यांची विचार करण्याची पद्धत काहीही असो.

मोदींनी पुढे म्हटलं की, आम्हाला प्रत्येक गोष्टीवर सहमत असण्याची गरज नाही, सार्वजनिक जीवनात इतकी सभ्यता असावी की भिन्न विचारसरणीचे लोक एकमेकांचं ऐकू शकतील. मोदींनी देशवासियांना संबोधित करताना म्हटलं की, हा एक नवा भारत आहे, जिथे तरूणांचं आडनावाला महत्त्व नसून त्यांच नाव सिद्ध करण्याच्या क्षमतेला महत्व आहे. हा नवीन भारत देश आहे, येथे भ्रष्टाचाराला कोणताही पर्याय नाही आहे.  

पंतप्रधान म्हणाले की आज त्यांना असं सुचवायचं आहे की 'आपण या भाषा ऐक्यासाठी वापरू शकत नाही? माध्यम पुल म्हणून काम करू शकते आणि वेगवेगळ्या भाषा बोलणार्‍या लोकांना जवळ आणू शकेल? ही गोष्ट कठिण नाही जितकी दिसते. मोदींनी पुढे सांगितलं की, आज लोकं म्हणतात की आम्ही स्वच्छ भारत बनवणारच. आम्ही भारताला भ्रष्टाचाराला मुक्त देश करणारच. आम्ही सुशासन एक जनआंदोलन करत राहू. हे सर्व केवळ दृढ इच्छेमुळे शक्य आहे.

मोदी म्हणाले की, आता सामान्य लोकांनी रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. कोणीही असा विचार केला होता की, हे कधी शक्य होईल? व्यवस्था देखील एकसारखी आहे आणि लोक देखील समान आहेत. केवळ कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...