राज्यातल्या सत्तेसाठी दिल्लीत खलबतं, आज मोदी, शहा यांची बैठक

राज्याच्या राजकीय परिस्थितीवर आज 6 नोव्हेंबरला  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा  यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री परिषदेची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीचं आयोजन मोदी यांच

Modi and shah
राज्यातल्या सत्तेसाठी दिल्लीत खलबतं, आज मोदी, शहा यांची बैठक  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी आता भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
  • राज्याच्या राजकीय परिस्थितीवर आज 6 नोव्हेंबरला  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा  यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. 
  • केंद्रीय मंत्री परिषदेची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी आता भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ओल्या दुष्काळासंदर्भातली जरी ही भेट असली तरी या बैठकीत सत्तास्थापनेवरूनही चर्चा झाल्याचं बोललं जातंय. याचवेळी अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यातच आता राज्याच्या राजकीय परिस्थितीवर आज 6 नोव्हेंबरला  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा  यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री परिषदेची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीचं आयोजन मोदी यांच्या निवासस्थानी करण्यात आलं आहे. या बैठकीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. 

सोमवारी दिल्लीतून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दुपारी वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमेटीची बैठक बोलावली होती. या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह काही नेते उपस्थित होते. दरम्यान अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री म्हणाले होते की, सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलत आहे यावर मी बोलणार नाही, भाजपमधूनही कोणी बोलणार नाही. राज्यात नवं सरकार निश्चित बनेल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे. 

त्यानंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांची देखील भेट घेतली. तसंच भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की, निवडणुकीत जनादेश हा महायुतीला दिला आहे आणि या जनादेशाचा आदर करुन सत्ता स्थापन करु. आम्हाला शिवसेनेने अद्याप कुठलाही प्रस्ताव दिलेला नाहीये, शिवसेनेसाठी भाजपची दारं २४ तास खुली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रृत्वात सरकार स्थापन होईल आणि यात कोणालाही शंका नाहीये.  तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, लवकरच गोड बातमी मिळेल आणि आम्ही शिवसेनेची वाट पाहून महायुतीचं सरकार स्थापन करु.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी