वन नेशन, वन इलेक्शन ही काळाची गरज - पंतप्रधान मोदी 

देशात एकाच वेळी निवडणुका ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. देशात काही महिन्याच्या अंतराने निवडणुका होत असल्याने देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो

pm modi pitches for one nation one election
वन नेशन, वन इलेक्शन ही काळाची गरज - पंतप्रधान मोदी   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • देशात एकाच वेळी निवडणुका ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
  • देशात काही महिन्याच्या अंतराने निवडणुका होत असल्याने देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो.
  • संविधान दिनानिमित्त ८० व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाच्या समारोप सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ते बोलत होते.

नवी दिल्ली :  देशात एकाच वेळी निवडणुका ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. देशात काही महिन्याच्या अंतराने निवडणुका होत असल्याने देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. संविधान दिनानिमित्त ८० व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाच्या समारोप सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ते बोलत होते. यावेळी त्यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहिदांना आणि ठार झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली दिली. ते म्हणाले भारत आता दहशतवादाशी लढत आहे पण नवीन निती आणि नव्या पद्धतीने... 

पंतप्रधान मोदी म्हणाले, काही महिन्यात कोणत्या तरी एका राज्यात निवडणुका असल्याने त्याचा परिणाम विकास कामावर होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यासाठी वन नेशन-वन इलेक्शन वर गंभीर अभ्यास आणि चर्चा करण्याची गरज आहे. 

या शिवाय पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा, विधानसभा आणि पंचायत निवडणुकांसाठी एकच मतदार यादीची शिफारस केली. वेगवेगळ्या याद्यांमुळे साधनांचा अपव्य होतो. आपल्या हे लक्षात ठेवले पाहिजे, की जेव्हा नागरिक आणि नेशन फर्स्टच्या नीतींवर राजकारण प्रभाव करते तेव्हा याचा विपरित परिणाम देशाला भोगावे लागतात. 

दरम्यान, यापूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यावर सरकारचा फोकस असल्याचे म्हटले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी