100 crore vaccinations भारतात १०० कोटींपेक्षा जास्त लसचे डोस टोचले, मोदींच्या उपस्थितीत लोहिया हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम

भारताने आज सकाळी १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला म्हणून दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये (आरएमएल हॉस्पिटल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष सोहळा झाला.

PM Modi present at Delhi's RML Hospital as India achieves the landmark one billion COVID19 vaccinations
भारतात १०० कोटींपेक्षा जास्त लसचे डोस टोचले, मोदींच्या उपस्थितीत लोहिया हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम 
थोडं पण कामाचं
  • भारतात १०० कोटींपेक्षा जास्त लसचे डोस टोचले, मोदींच्या उपस्थितीत लोहिया हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम
  • भारतात आतापर्यंत १०० कोटी ४८ लाख ९० हजार ४८२ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले
  • अरुण राय नावाच्या व्यक्तीला १०० कोटी क्रमांकाचा लसचा डोस देण्यात आला

नवी दिल्ली: भारतात आतापर्यंत १०० कोटी ४८ लाख ९० हजार ४८२ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. यापैकी ७१ कोटी २ लाख ९८ हजार ७५५ जणांना लसचा पहिला डोस तर २९ कोटी ४५ लाख ९१ हजार ७२७ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. याआधी भारताने आज (गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१) सकाळी १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला म्हणून दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये (आरएमएल हॉस्पिटल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष सोहळा झाला. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षक, नर्स, दिव्यांग रुग्ण यांच्याशी संवाद साधला. PM Modi present at Delhi's RML Hospital as India achieves the landmark one billion COVID19 vaccinations

अरुण राय नावाच्या व्यक्तीला १०० कोटी क्रमांकाचा लसचा डोस देण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी या अरुण राय यांच्याशी बातचीत केली. अरुण हे मूळचे पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील रहिवासी आहेत. ते खासगी कामासाठी दिल्लीत आले होते. दिल्लीत असताना त्यांनी लोहिया हॉस्पिटलमध्ये लस घेण्यासाठी नोंदणी केली आणि १०० कोटी क्रमांकाचा लसचा डोस टोचून घेण्याचा मान त्यांना मिळाला. 

दिव्यांग असलेल्या अरुण यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी थोडा वेळ बातचीत केली. समोर आलेले प्रत्येक आव्हान पार करत लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोहिया हॉस्पिटलच्या एका नर्सशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका दिव्यांग मुलीशी गप्पा मारल्या. या मुलीने पंतप्रधान मोदी यांना ए मेरे वतन के लोगो... हे गाणे गाऊन सादर केले. पंतप्रधान मोदी यांनी मुलीचे कौतुक केले. 

सरकारी कार्यक्रमामुळे अरुण राय यांना लस टोचण्यात थोडा वेळ गेला यामुळे काही त्रास तर झाला नाही न, अशा स्वरुपाची चौकशी पंतप्रधान मोदी यांनी केली. पण 'माझी काही तक्रार नाही. माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. १०० कोटीवा डोस टोचून घेण्याची संधी मिळाली ही विशेष बाब आहे'; असे अरुण राय यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी नंतर लोहिया हॉस्पिटलच्या अधिकारी-कर्मचारी, प्रमुख डॉक्टर यांच्याशी थोडा वेळ बातचीत केली. याप्रसंगी भारताचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी