सातत्याने वाढत आहे नरेंद्र मोदींचे यश, आता मिळणार आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 27, 2021 | 12:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठवड्यात वार्षिक आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनात CERAWeek वैश्विक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार स्वीकारणार आहेत. 1 ते 5 मार्चदरम्यान या कार्यक्रमात ते मुख्य भाषणही करणार आहेत.

PM Narendra Modi
सातत्याने वाढत आहे नरेंद्र मोदींचे यश, आता मिळणार आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार 

थोडं पण कामाचं

  • हे असणार संमेलनाचे प्रमुख वक्ते
  • जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचा दृष्टिकोन महत्वाचा
  • भारत वैश्विक ऊर्जा आणि पर्यावरण केंद्र म्हणून उभा राहत आहे

वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या आठवड्यात एका वार्षिक आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनात (annual international energy summit) CERAWeek वैश्विक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार (award) स्वीकारणार आहेत. पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार 1 ते 5 मार्चदरम्यानच्या या कार्यक्रमात ते मुख्य भाषणही (main address) करणार आहेत. याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक IHS Markit यांनी दिली.

हे असणार संमेलनाचे प्रमुख वक्ते

या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून जलवायू क्षेत्रासाठी अमेरिकेचे विशेष राष्ट्रपती दूत जॉन केरी, बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहअध्यक्ष आणि ब्रेकथ्रू अॅनर्जी बिल गेट्सचे संस्थापक आणि सौदी अरामकोसे सीईओ अमीर नासिर सहभागी होणार आहेत.

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचा दृष्टिकोन महत्वाचा

IHS Markitचे व्हाईस चेअरमन आणि संमेलनाचे अध्यक्ष डॅनिएल येर्गिन म्हणाले, "आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाहीच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी तत्पर आहोत. देश आणि जगाची भावी ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी सतत विकासात भारताचे नेतृत्व करण्याच्या आपल्या कटिबद्धतेसाठी त्यांना CERAWeek वैश्विक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे."

भारत वैश्विक ऊर्जा आणि पर्यावरण केंद्र म्हणून उभा राहात आहे

त्यांनी म्हटले की आर्थिक विकास, गरीबी कमी करणे आणि एका नव्या ऊर्जाभविष्याच्या दिशेने आपला रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने भारत वैश्विक ऊर्जा आणि पर्यावरण केंद्र म्हणून उभा राहात आहे आणि याचे नेतृत्व सार्वभौमिक ऊर्जेचा पुरवठा सुनिश्चित करत एका स्थिर भविष्यासाठी जलवायूंच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. या वार्षिक संमेलनात ऊर्जा उद्योगातील नेते, तज्ञ, सरकारी अधिकारी आणि धोरणकर्ते, औद्योगिक क्षेत्रातील नेते, आर्थिक आणि औद्योगिक संस्थांचे समूह सामिल होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी