भारताच्या आरोग्य क्षेत्रात २०१४ नंतर झाली १२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक

PM Modi said FDI of more than 12 billion dollar came in the healthcare sector since 2014 भारताच्या आरोग्य क्षेत्रात २०१४ पासून आतापर्यंत १२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

PM Modi said FDI of more than 12 billion dollar came in the healthcare sector since 2014
भारताच्या आरोग्य क्षेत्रात २०१४ नंतर झाली १२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • भारताच्या आरोग्य क्षेत्रात २०१४ नंतर झाली १२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक
  • औषध आणि लस यांच्या संशोधन आणि निर्मिती प्रक्रियेला चालना
  • १०० देशांना ६५० लाखांपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस निर्यात केले

PM Modi said FDI of more than 12 billion dollar came in the healthcare sector since 2014 नवी दिल्ली: भारताच्या आरोग्य क्षेत्रात २०१४ पासून आतापर्यंत १२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते फार्मास्युटिकल्स क्षेत्राच्या पहिल्या ग्लोबल इनोव्हेशन समिटच्या उद्घाटनासाठी भाषणात बोलत होते.

कोरोना संकटामुळे औषध आणि लस यांच्या संशोधन आणि निर्मिती प्रक्रियेला चालना दिली. मागील दोन वर्षांत भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष आरोग्य क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या बाजूंकडे वेधले गेले. आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हाव्या, यासाठी निधीची तरतूद केली गेली. अनेक योजना राबवण्यात आल्या; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी भारताच्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांचे कौतुक केले. उच्च गुणवत्ता आणि निर्मितीची मोठी क्षमता यामुळे भारतीय कंपन्यांची विश्वासार्हता वाढल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारताने कोरोना संकटात १५० पेक्षा जास्त देशांना आरोग्य सेवेशी संबंधित उत्पादने, उपकरणे यांची निर्यात केली. वाजवी दर, हाताळण्याची सोपी पद्धत, उच्च गुणवत्ता निर्मितीची मोठी क्षमता यामुळे जगातील अनेक देशांनी भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांना प्राधान्य दिले. भारताने २०२१ या एका वर्षात आतापर्यंत जवळपास १०० देशांना ६५० लाखांपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस निर्यात केले. 

भारताला औषध आणि लस यांच्या संशोधन आणि निर्मिती प्रक्रियेचे नेतृत्व करता यावे यासाठी उपयुक्त अशी व्यवस्था निर्माण करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. भारताचा भर आत्मनिर्भरतेवर आहे. भारतीयांसाठी आवश्यक सर्व प्रकारची औषधे आणि लस यांचे संशोधन आणि निर्मिती भारतातच व्हावी यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे; अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी