PM Modi to inaugurate Purvanchal Expressway : पंतप्रधान मोदी करणार पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन; द्रुतगती मार्गावर मिराज आणि सुखोई दाखवतील एअर शो

PM Modi to inaugurate Purvanchal Expressway :पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज 340 किलोमीटर लांब असलेल्या पूर्वांचल एक्सप्रेसचं (Purvanchal Express) उद्धघाटन (Inauguration) करतील. हा 340 किमी लांबीचा एक्स्प्रेस वे लखनऊ (Lucknow)मधून बाराबंकी, फैजाबाद, आंबेडकर नगर, अमेठी, सुलतानपूर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर (Ghazipur)पर्यंत जातो.

PM Modi to inaugurate Rs 22,494 crore Purvanchal Expressway
पंतप्रधान मोदी आज करणार पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशला पूर्वांचल एक्सप्रेस वे भेट देणार
  • ३४०.१ किमी लांबीचा पूर्वांचल एक्सप्रेस वे लखनौ ते गाझीपूरपर्यंत जाईल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई दलाचे विमान हर्क्युलसने द्रुतगती मार्गावर उतरवणार

PM Modi to inaugurate Purvanchal Expressway : नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज 340 किलोमीटर लांब असलेल्या पूर्वांचल एक्सप्रेसचं (Purvanchal Express) उद्धघाटन (Inauguration) करतील. हा 340 किमी लांबीचा एक्स्प्रेस वे लखनऊ (Lucknow)मधून बाराबंकी, फैजाबाद, आंबेडकर नगर, अमेठी, सुलतानपूर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर (Ghazipur)पर्यंत जातो. या एक्स्प्रेस वेने दिल्लीहून थेट यूपीच्या पूर्वेकडील कोपऱ्यापर्यंत फक्त 10 तासात पोहोचता येणार आहे. या एक्स्प्रेस वेचे उद्धघाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई दलाचे विशेष वाहतूक विमान C-130j सुपर हर्क्युलसने एक्सप्रेस वेवर उतरवतील. त्यानंतर पंतप्रधान नागरिकांना सबोधित करतील. यासोबतच हवाई दलाचे विमान 45 मिनिटांचा एअर शो करत शक्ती प्रदर्शन करतील. 

सुमारे 42,000 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूर्वांचल एक्सप्रेस वे पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशला जोडतो. हा एक्स्प्रेस वे लखनौ ते गाझीपूरपर्यंत आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे चार तासांनी कमी होईल. हा एक्स्प्रेस वे बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, फैजाबाद, आंबेडकर नगर, आझमगड आणि मऊमधून जातो. या मार्गात 7 मोठे पूल, 7 रेल्वे ओव्हरब्रीज, 114 छोटे पूल आणि 271 अंडरपास असतील. उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे, ज्याकडे हवाई पट्टी असलेले दोन द्रुतगती मार्ग आहेत.  एक हवाई पट्टी लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर आहे आणि दुसरी पूर्वांचल एक्सप्रेसवेवर आहे. द्रुतगती मार्गावरील हवाई पट्ट्या आपत्कालीन लँडिंग आणि लढाऊ विमानांच्या टेक-ऑफसाठी डिझाइन केल्या आहेत.

आकाशातून फुलांचा होईल वर्षाव 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130j सुपर हर्क्युलस या वाहतूक विमानातून तेथे उतरतील. एक्स्प्रेस हायवेचे उद्घाटनही ते करणार आहेत. यादरम्यान अपाचे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी एक तास ४५ मिनिटे राहणार 

पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे, युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत येथे हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर हवाई पट्टी तयार केली गेली आहे. 16 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज पंतप्रधान पूर्वांचल एक्सप्रेसवेवर अशाच आपत्कालीन हवाई पट्टीवर उतरतील. या पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर पंतप्रधान मोदी एक तास ४५ मिनिटे असतील.

कधी होणार एअर शो 

पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हवाई दलाचे विमान सुलतानपूरमधील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर बांधलेल्या ३.१ किमी लांबीच्या धावपट्टीवर उतरतील. पहिले मिराज 2000 लढाऊ विमान 2:50 वाजता एक्सप्रेसवेवर उतरेल. यानंतर मिरजेची सर्व्हिसिंग टीम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट AN-32 मधून उतरेल आणि रस्त्यावरच विमानाची सर्विस करेल. वाहतूक विमान एएन-32 मधून हवाई दलाचे गरुड कमांडो उतरतील आणि शत्रूच्या प्रदेशात जाऊन लढाऊ विमान आणि टीम कशी सुरक्षित ठेवली जाते हे दाखवतील. त्यानंतर तीन वाजून पाच मिनिटांनी प्लाय पास्टमध्ये पाच पैकी एक लढाऊ विमानापैकी एक  मिराज 2000, दोन सुखोई एमकेआय आणि दोन जग्वार एरोहेड फॉर्मेशनमध्ये उड्डाण करतील.  दुपारी 3.07 वाजता  AN-32 उड्डाण करेल. आधी मिराज 2000 नंतर जग्वार आणि सुखोई 30 टच डाऊन करतील आणि नंतर टेक ऑफ करणार आहेत. 

या कार्यक्रमात हे राहतील उपस्थित 

राज्यपाल आनंदीबेन पटेल, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अयोध्येचे खासदार लल्लू सिंह, अनुराग ठाकूर, खासदार मनेका गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

6 आयपीएस पंतप्रधानांची सुरक्षा हाताळतील 

एडीजी कायदा आणि सुव्यवस्था एसएन सावंत म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांसह सहा आयपीएस दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पूर्वांचल एक्सप्रेसच्या गुणवत्तेवर एक नजर

  • हा द्रुतगती मार्ग 340.8 किमी लांबीचा 6 लेन एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे.
  • एक्सप्रेसवेचा प्रवेश बिंदू लखनौ-सुलतानपूर मार्गावरील चांदसराय गाव आहे तर एक्झिट पॉइंट गाझीपूरचे हैदरिया गाव आहे जे बिहार सीमेपासून 18 किमी अंतरावर आहे.
  • पूर्वांचल एक्स्प्रेस वेची किंमत 22,494 कोटी रुपये आहे ज्यात संपादित केलेल्या जमिनीच्या किमतीचा समावेश आहे. 
  • युपी या राज्याच्या लखनौ, बाराबंकी, फैजाबाद, आंबेडकर नगर, अमेठी, सुलतानपूर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर या नऊ जिल्ह्यांतून जातो.
  • सहा लेनचा हा एक्स्प्रेस वे आठ लेनपर्यंत वाढवता येईल. 300 किमीचा प्रवास अवघ्या साडेतीन तासांत पूर्ण करता येतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी