PM Modi : प्रजासत्ताक दिनाआधी पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय, 21 परमवीर सैनिकांच्या नावाने ओळखली जाणार अंदमान निकोबारमधील बेटे

PM Modi to name 21 unnamed islands of Andaman & Nicobar after Param Vir Chakra awardees : आजपासून अंदमान निकोबार बेटांच्या समुहातील 21 मोठी बेटे ही भारताच्या परमवीर पुरस्कार विजेत्या सैनिकांच्या नावाने ओळखली जातील. बेटांच्या नामकरणाचा विधी आज सोमवार 23 जानेवारी 2023 रोजी पार पडेल.

PM Modi to name 21 unnamed islands of Andaman & Nicobar after Param Vir Chakra awardees
21 परमवीर सैनिकांच्या नावे ओळखली जाणार अंदमान निकोबारची बेटे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • प्रजासत्ताक दिनाआधी पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय
  • 21 परमवीर सैनिकांच्या नावाने ओळखली जाणार अंदमान निकोबारमधील बेटे
  • नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे पंतप्रधान करणार अनावरण

PM Modi to name 21 unnamed islands of Andaman & Nicobar after Param Vir Chakra awardees : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती भारतात पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. या निर्णयानुसार आज सोमवार 23 जानेवारी 2023 रोजी पराक्रम दिवस साजरा होत आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून अंदमान निकोबार बेटांच्या समुहातील 21 मोठी बेटे ही भारताच्या परमवीर पुरस्कार विजेत्या सैनिकांच्या नावाने ओळखली जातील. बेटांच्या नामकरणाचा विधी आज सोमवार 23 जानेवारी 2023 रोजी पार पडेल. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेटांच्या नामकरणाच्या कार्यक्रमासाठी पोर्ट ब्लेअर येथे पोहोचले आहेत. गृहमंत्री पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजिण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. 

नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे पंतप्रधान करणार अनावरण

नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर उभारण्यात येणाऱ्या नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे अनावरण देखील 21 बेटांच्या नामकरण सोहळ्यात पंतप्रधान करणार आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2018 मधील या बेटांच्या भेटीच्या वेळी रॉस बेटांना नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे नाव दिले. नील बेट आणि हॅवलॉक बेट यांचे देखील शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नामकरण करण्यात आले होते.

परमवीर चक्र म्हणजे काय?

परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 21 परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले 14 पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. प्रदान केलेल्या 21 परमवीर चक्र पुरस्कारांपैकी 20 भूदलाच्या (Indian Army) सैनिकांना आणि 1 वायुदलाच्या (हवाई दल / Indian Air Force) सैनिकाला देण्यात आला आहे.

ग्रेनेडियर्स रेजिमेंट आणि गोरखा रायफल्सच्या प्रत्येकी 3 सैनिकांना तर शीख रेजिमेंट, कुमाऊॅं रेजिमेंट, जम्मू काश्मीर रायफल्स आणि द पूना हॉर्सेस यांच्या प्रत्येकी 2 सैनिकांना परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. परवीर चक्र विजेत्यांमध्ये लेफ्टनंट अर्देशर तारापोर हे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या शुभेच्छा! Marathi Wishes Share on Facebook, Twitter, Whatsapp, Telegram, Whatsapp Status

Balasaheb Thackeray Speech : एकच साहेब बाळासाहेब : बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त करायचे भाषण

परमवीर चक्र विजेते

भारत पाकिस्तान युद्ध 1947-48

1. मेजर सोमनाथ शर्मा
2. लान्स नायक करम सिंह
3. नायक यदुनाथ सिंग
4. सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे
5. कंपनी हवालदार मेजर पीरू सिंग शेखावत

संयुक्त राष्ट्रे शांतीसेनेची कारवाई

6. कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया

भारत चीन युद्ध 1962

7. मेजर धनसिंग थापा
8. सुबेदार जोगिंदर सिंग    
9. मेजर शैतान सिंग

भारत पाकिस्तान युद्ध 1965

10. कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद
11. लेफ्टनंट कर्नल अर्देशर तारापोर

भारत पाकिस्तान युद्ध 1971

12. लान्स नायक आल्बर्ट एक्का
13. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह शेखों
14. लेफ्टनंट अरुण खेतरपाल
15. मेजर होशियार सिंह

सियाचीन संघर्ष 1987

16. नायब सूबेदार बन्ना सिंग

भारतीय शांतीसेनेची कारवाई

17. मेजर रामस्वामी परमेश्वरन

कारगिलची लढाई 1999

18. लेफ्टनंट मनोज कुमार पांडे
19. ग्रेनेडियर योगेन्द्र सिंह यादव
20. रायफलमन संजय कुमार
21. कॅप्टन विक्रम बात्रा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी