पंतप्रधान मोदी आज 'या' राज्याला देणार तब्बल 16 हजार कोटींची भेट, अनेक प्रकल्पांचं करणार उद्घाटन

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मोदी नवीन प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत त्यासोबतच 11.5 किमी लांबीच्या रोड शोमध्ये सुद्धा भाग घेतील.

PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी 
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड दौऱ्यावर असणार आहेत.
  • पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
  • आज मोदी येथे देवघर विमानतळासह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

झारखंड: PM Modi visit to Deoghar Jharkhand: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Modi) देवघर  (Deoghar) विमानतळ आणि एम्ससह झारखंडला 16 हजार कोटींहून अधिक किंमतीच्या योजना भेट म्हणून देतील. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या झारखंडमधील देवघर जिल्ह्याच्या (Deoghar Airport)दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. आज मोदी येथे  देवघर विमानतळासह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मोदी नवीन प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत त्यासोबतच 11.5 किमी लांबीच्या रोड शोमध्ये सुद्धा भाग घेतील. पुढे त्यांनी सांगितलं की, जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बाबा बैद्यनाथ धाम मंदिराला (Deoghar Baba Baidyanath Dham Temple)भेट देतील.

अधिक वाचा-  James Webb Space Telescope: NASA च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने पाठवलं आकाशगंगेचे पहिले आश्चर्यकारक रंगीत फोटो

पंतप्रधान 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमध्ये 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केलं जाईल. यानिमित्ताने 657 एकर परिसरात बांधण्यात आलेला विमानतळ परिसरातील जनतेला समर्पित करण्यात येणार आहे. हे विमानतळ 401 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात 12 जुलैपासून कोलकाता-देवघर विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा विमान वाहतूक कंपनी इंडिगोनं केली.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाबाबत सोमवारी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. लोकसभा सदस्य निशिकांत दुबे यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी 11.5 किमी लांबीच्या रोड शोला "ऐतिहासिक घटना" म्हटलं आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आज होणाऱ्या रोड शोमध्ये लाखो लोक सहभागी होण्याचा अंदाज आहे. कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी परिसरात उपाययोजना करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. 

अधिक वाचा-  Maharashtra Rain Update : आजही राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

मोदींच्या रोड शोसाठी ड्रोन तैनात 

पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण रोड शोवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तैनात करण्यात आले आहे. 14 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रावणी मेळ्यात सहभागी होण्यासाठी दूर-दूरवरून लोक देवघर येथे पोहोचत असून त्यांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात आल्याचं ही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारी आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक ही घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी