PM Modi Twitter : पंतप्रधान मोदी यांचं ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली मोठी घोषणा

PM Modi Twitter account Hack : क्रिप्टो करन्सीवर (Crypto Currency) देशात गोंधळाची स्थिती आहे. सरकार (Government) ने अशा करन्सीला मान्यता द्यायला नकार दिलेला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचं ट्विटर अकाऊंट (Twitter account) हॅक (Hack) झाले आहे.

 PM Modi's Twitter account hacked
पंतप्रधान मोदी यांचं ट्वीटर अकाउंट हॅक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पीएम मोदींच्या हॅक झालेल्या ट्विटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास बिटकॉइनबद्दल मोठी घोषणा करण्यात आली.
  • बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची घोषणा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाउंट 12 डिसेंबर रोजी सकाळी दोन वाजण्याच्या सुमारास हॅक

PM Modi Twitter account Hack :नवी दिल्ली :  क्रिप्टो करन्सीवर (Crypto Currency) देशात गोंधळाची स्थिती आहे. सरकार (Government) ने अशा करन्सीला मान्यता द्यायला नकार दिलेला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचं ट्विटर अकाऊंट (Twitter account) हॅक (Hack) झाले आहे. पीएम मोदींच्या हॅक झालेल्या ट्विटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइन (Bitcoin) ला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याचे समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटवरून बिटकॉइनबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावरून काही ट्वीट करण्यात आले. यामध्ये बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाउंट 12 डिसेंबर रोजी सकाळी दोन वाजण्याच्या सुमारास हॅक करण्यात आले होते. 

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटसोबत छेडछाड करण्यात आली. याबाबतची माहिती ट्वीटरला देण्यात आली आहे. आता त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित करण्यात आले आहे. हॅकरने केलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. 

हॅकर्सनी नेमकं काय ट्विट केलं?

रविवारी पहाटेच्या सुमारास म्हणजेच 2 वाजून 11 मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचं ट्विटर हँडल हॅक करण्यात आले. हॅकर्सनी मग त्याचा वापर बिटकॉईनच्या संदर्भात घोषणा करण्यासाठी केला. ‘भारताने रितसर बिटक्वाईन कायद्याला मंजुरी दिली आहे आणि सरकार 500 BTC खरेदी करुन लोकांना वाटत आहे’ असं हॅकर्सनी ट्विट केलं. पण हॅकर्सचा हा गोंधळ फार काळ चालला नाही. दोन मिनिटानंतर हे ट्विट डिलिट केलं गेलं. नंतर पुन्हा 2 वाजून 14 मिनिटांनी पुन्हा ट्विट केलं गेलं. ज्यात पुन्हा आधीचाच मजकूर होता बिटक्वाईन्सला मान्यता देणार. त्यानंतर पुन्हा हे बेकायदेशीर ट्विटही डिलिट केलं गेलं. पण तोपर्यंत लोकांनी त्याचे स्क्रिनशॉट घेऊन व्हायरल केले. 

हॅकर्सच्या टार्गेटवर पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याची ही काही पहिली वेळ नाही. मोदींच्या पर्सनल वेबसाईटच्या ट्विटर हँडललाही हॅक केले गेले होते. त्यावेळेस कोरोना रुग्णांसाठी दान बिटकॉईन्सच्या रुपात द्यावे असं सांगितले गेले होते. अर्थातच नंतर हे ट्विट डिलिट केले गेले होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी