पेपर वर्कच्या गराड्यात पंतप्रधान मोदींचा दिल्ली ते अमेरिकेचा प्रवास, मोदींनी ट्विट केला फोटो

प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींनी एक ट्विट केले. ट्विट केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी फाईल हातात धरताना दिसत आहेत.

Prime Minister Modi's journey from Delhi to America in the paper work
पेपर वर्कच्या गराड्यात पंतप्रधान मोदींचा अमेरिका प्रवास  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना झाले.
  • या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार आहेत.
  • भारतीय वेळेनुसार, मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Washington Dulles International Airport) दाखल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर (visit to US) आहेत. भारतीय वेळेनुसार, मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Washington Dulles International Airport) दाखल झाले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळदेखील आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. सोबतच क्वाड लीडर्स मीट आणि यूएनजीएसोबत पहिली बैठक देखील घेणार आहेत.    

दरम्यान, काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना झाले होते. साधरण नवी दिल्ली ते वॉशिंग्टन हा प्रवास 15.30 तासांचा असतो, मात्र पंतप्रधान मोदींचं विमान कोणत्याही थांब्याशिवाय वॉशिंग्टनमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे त्यांचे विमान कमी वेळेत पोहोचले. इतक्या लांबच्या प्रवासात पंतप्रधान मोदी काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडत असतो. अनेकांच्या या प्रश्नांचे उत्तर पंतप्रधान मोदींनी एक फोटो ट्विट करत  दिलं आहे, 

पंतप्रधानांचे ट्विट होतोय व्हायरल 

पीएम मोदींनी फोटो शेअर करत सांगितले की ते लांब पल्ल्याच्या फ्लाइटमध्ये वेळ कसा घालवतात. प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींनी एक ट्विट केले. ट्विट केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी फाईल हातात धरताना दिसत आहेत. फाईल्ससोबतच पंतप्रधानांच्या हातात पेनही आहे. पंतप्रधानांनी या फोटोला कॅप्शनही दिले आहे. या कॅप्शनमध्ये मोदींनी  म्हटलं आहे की, “लांब हवाई यात्रा म्हणजे पेपर वर्क पूर्ण करण्याची, कागदी कार्यवाही पूर्ण करण्याची संधी असते.” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो व्हायरल होत आहे, अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, आम्ही आमच्या जीवनात ही गोष्टींचं पालन करू. पंतप्रधान मोदींची ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्रपती निवडल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि  बायडन यांची ही पहिलीच भेट असणार आहे.

नॉनस्टॉप हवाई प्रवास

भारतीय पंतप्रधान पहिल्यांदाच विमानाने नॉनस्टॉप अमेरिकेचा प्रवास करत आहेत. हे शक्य झाले आहे कारण भारतीय विमाने पाकिस्तानी हवाई क्षेत्र वापरून अमेरिकेला उड्डाण करत आहेत. भारतीय व्हीव्हीआयपी वाहतुकीसाठी खरेदी केलेल्या नवीन आणि विशेष सुविधांनी सुसज्ज विमानाची ही पहिलीच अधिकृत अमेरिकावारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना महामारीच्या संकटानंतर पहिल्यांदाच अमेरिकेला गेले आहेत.

किती तासांचा प्रवास?

नवी दिल्ली ते वॉशिंग्टन हा प्रवास 15.30 तासांचा असतो, मात्र पंतप्रधान मोदींचं विमान कोणत्याही थांब्याशिवाय वॉशिंग्टनमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे त्यांचे विमान कमी वेळेत पोहोचले पाहिजे. मात्र मोदींचे विमान थेट अफगाणिस्तानमार्गे न जाता पाकिस्तानमार्गे जात असल्याने त्यांना थोडा जास्त वेळ लागू शकतो. नवी दिल्ली ते न्यूयॉर्कपर्यंत नॉन-स्टॉप फ्लाइटची वेळ 15 तास 30 मिनिटे आहे. नवी दिल्ली आणि न्यूयॉर्क दरम्यान फास्ट वन-स्टॉप प्रवास हा जवळजवळ 19 तासांचा असतो. या प्रवासात विमान दुबईत उतरते. तिथे विमानात पुन्हा एकदा इंधन भरले जाते आणि मग विमान अमेरिकेकडे मार्गस्थ होते. तथापि, काही एअरलाइन्स स्टॉपओव्हर डेस्टिनेशन आणि प्रतीक्षा कालावधीवर आधारित 30 तासांपेक्षा जास्त वेळ घेतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी