Shabaash Manya: PM मोदींनी बर्लिनमध्ये घेतली भारतीय वंशांच्या लोकांची भेट; मुलीने बनवलेल्या पेंटीगवर केली सही 

लोकल ते ग्लोबल
Updated May 02, 2022 | 16:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

PM Modi Visit Berlin | पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी जर्मनीतील बर्लिन येथे दाखल झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यातील पहिला मुक्काम हा जर्मनी येथे आहे. यादरम्यान मोदी चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलतांचे सह-अध्यक्षही देखील असतील.

PM Modi visits Indian Diaspora in Berlin, Signed on a painting made by a girl of Indian descent
PM मोदींनी बर्लिनमध्ये घेतली भारतीय डायस्पोराची भेट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी जर्मनीतील बर्लिन येथे दाखल झाले.
  • जर्मनीच्या राजधानीत भारतीय डायस्पोरांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
  • पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पाचव्यांदा जर्मनीला भेट देत आहेत.

PM Modi Visit Berlin | बर्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी जर्मनीतील बर्लिन येथे दाखल झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यातील पहिला मुक्काम हा जर्मनी येथे आहे. यादरम्यान मोदी चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलतांचे सह-अध्यक्षही देखील असतील. लक्षणीय बाब म्हणजे जर्मनीची ही भेट अशा वेळी आली आहे जेव्हा नवी दिल्ली आणि बर्लिन ही दोन्ही शहरं द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. (PM Modi visits Indian Diaspora in Berlin, Signed on a painting made by a girl of Indian descent). 

अधिक वाचा : या मराठी अभिनेत्रीने दिली अमृता फडणवीसांना दिली म्हशीची उपमा

जर्मनी भाषेत केले ट्विट 

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी इंग्रजी आणि जर्मनी भाषेत ट्विट करत म्हटले की, "आज मी बर्लिन येथे दाखल झालो आहे. मी चांसलर @OlafScholz यांच्याशी चर्चा करणार आहे. व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधणार आहे आणि सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहे. मला विश्वास आहे की या भेटीमुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील मैत्रीला बळ मिळेल,”

भारतीय समुदायातील लोकांची केली स्तुती

जर्मनीच्या राजधानीत भारतीय वंशाच्या लोकांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. मोदींनी या हावभावाला प्रत्युत्तर दिले आणि ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, "बर्लिनमध्ये पहाटेची वेळ होती तरीही इथे भारतीय समुदायातील अनेक लोक आले. त्यांच्याशी साधलेला संवाद अप्रतिम होता. भारतीय वंशाच्या लोकांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे."

अधिक वाचा : मुंबईतील लोकल ट्रेनच्या एसी, फर्स्ट क्लासच्या भाड्यात कपात..

चिमुकलीने मोदींना मानले आयकॉन 

दरम्यान, पंतप्रधानांनी लहान मुलांसह भारतीय समुदायातील काही सदस्यांशी संवाद साधला. मन्या नावाच्या एका मुलीने पीएम मोदींना तिने बनवलेले पेंटिंग दाखवले. “पंतप्रधान मोदींना भेटणे हा एक अद्भुत अनुभव होता. ते माझे आयकॉन आहेत. मी बनवलेल्या पेंटिंगवर त्यांनी सही केली आणि मला ‘शाबाश’ म्हटले. असे मन्या नावाच्या भारतीय वंशाच्या मुलीने सांगितले. 

एका भारतीय समुदायाच्या गौरंग कौटुजा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मी ४०० किलोमीटरचा प्रवास करून बर्लिनला आलो होतो. “आम्ही पीएम मोदींची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होतो. तब्बल ४०० किलोमीटर अंतर कापत आम्ही बर्लिनला आलो. भारतीय वंशाच्या नागरिकांमधील आम्हा प्रत्येकाचे त्यांनी आदरपूर्वक अभिवादन केले. त्यानंतर आम्ही पंतप्रधान मोदी भारतीय वंशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत त्यासाठी उत्सुक आहोत. 

लक्षणीय बाब म्हणजे बर्लिनमध्ये आल्यावर पंतप्रधान मोदींनी भारतीय वंशाच्या तरुण मुलाचे देशभक्तीपर गीत गायल्यानंतर त्याचे कौतुकही केले. पाहा खालील व्हिडिओ. 

मोदी पाचव्यांदा जर्मनीच्या दौऱ्यावर 

पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पाचव्यांदा जर्मनीला भेट देत आहेत. त्यांनी यापूर्वी एप्रिल २०१८, जुलै २०१७, मे २०१७ आणि एप्रिल २०१५ मध्ये जर्मनीला भेट दिली होती. डिसेंबर २०२१ मध्ये पदभार स्वीकारलेल्या ओलाफ यांच्यासोबतची आजची पंतप्रधान मोदी यांची पहिलीच बैठक असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी