PM Modi's cabinet reshuffle : पीएम मोदींच्या मंत्रीमंडळात फेब्रुवारी 2023 मध्ये फेरबदल होणार, शिंदे समर्थक खासदारांना संधी मिळणार

PM Modi's cabinet reshuffle in February 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात फेब्रुवारी 2023 मध्ये फेरबदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर राज्याच्या बजेट सेशनआधी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी केले.

cabinet reshuffle
पीएम मोदींच्या मंत्रीमंडळात फेब्रुवारी 2023 मध्ये फेरबदल होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पीएम मोदींच्या मंत्रीमंडळात फेब्रुवारी 2023 मध्ये फेरबदल होणार
  • शिंदे समर्थक खासदारांना संधी मिळणार
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार

PM Modi's cabinet reshuffle in February 2023, CM Shinde's cabinet reshuffle in February 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात फेब्रुवारी 2023 मध्ये फेरबदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संसदेच्या बजेट सेशनचा (अर्थसंकल्पीय अधिवेशन) पहिला टप्पा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संपेल यानंतर फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक खासदारांपैकी एका खासदाराला कॅबिनेट मंत्र्याचे पद तर किमान 2 खासदारांना राज्यमंत्र्याचे पद मिळणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रीमंडळात किमान 3 खासदारांना संधी मिळाली तर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय सामर्थ्यात वाढ होईल. लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना तयारी करणे आणखी सोपे होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र खासदार चिराग पासवान मंत्रीमंडळात येण्यास इच्छुक आहेत. पण त्यांचे काका पशुपतीनाथ पासवान आधीपासूनच मंत्रीमंडळात आहेत. यामुळे चिराग यांना संधी मिळणार की नाही हा प्रश्न कायम आहे.

लोकसभेच्या निवडणुकीआधी नऊ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय घडामोडी बघता पूर्व भारतातील एका राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकीसाठी हालचाली वेगाने होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील राज्याविषयीचा अंदाज योग्य ठरल्यास नऊ ऐवजी दहा राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीआधी विधानसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकांचा विचार करून मोदींच्या मंत्रीमंडळात फेरबदल होतील, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Ganesh Jayanti 2023 Images in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त मराठी शुभेच्छा फोटो

Maghi Ganesh Jayanti 2023 : कधी आहे माघी गणेश जयंती? माघी गणेश जयंती का साजरी करतात?

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार

सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विस्ताराची प्रक्रिया बाकी आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत जेव्हा एकाच वेळी सारखे प्रश्न मांडले जातात, चर्चा होतात तेव्हा अडचणी येतात. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार लवकर करायचा आहे. हा विस्तार राज्याच्या बजेट सेशनआधी (अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी) करण्याबाबत चाचपणी सुरू आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी