Pradhanmantri Sangrahalaya : आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर नेहरूंच्या सरकारी निवासस्थानी सुरू होणार पीएम म्युझियम, मोदींच्या हस्ते उद्घाटन

PM Museum to be inaugurated at Nehru's official residence on the occasion of Ambedkar Jayanti, inaugurated by Modi : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेला भारत देश दिल्लीत पीएम म्युझियम अर्थात पंतप्रधान संग्रहालय सुरू करत आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी अकरा वाजता करणार आहेत.

PM Museum to be inaugurated at Nehru's official residence on the occasion of Ambedkar Jayanti, inaugurated by Modi
पीएम मोदी पंतप्रधान संग्रहालयाचे उद्‌घाटन करणार 
थोडं पण कामाचं
  • पीएम मोदी पंतप्रधान संग्रहालयाचे उद्‌घाटन करणार
  • आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर नेहरूंच्या सरकारी निवासस्थानी सुरू होणार पीएम म्युझियम
  • संग्रहालय स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भारताची कहाणी सांगणार

PM Museum to be inaugurated at Nehru's official residence on the occasion of Ambedkar Jayanti, inaugurated by Modi : नवी दिल्ली : गुरुवार १४ एप्रिल २०२२ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती आहे म्हणून नाही तर पीएम मोदी यांच्या हस्ते होणार असलेल्या उद्घाटन सोहळ्यामुळे हा दिवस चर्चेत राहणार आहे. इतिहासात या दिवसाची नोंद होणार आहे. 

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेला भारत देश दिल्लीत पीएम म्युझियम अर्थात पंतप्रधान संग्रहालय सुरू करत आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी अकरा वाजता करणार आहेत. पंतप्रधान संग्रहालयात देशाला लाभलेल्या सर्व पंतप्रधानांचे जीवन आणि देशाप्रती त्यांचे योगदान यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भारताची कहाणी प्रदर्शित केली जाईल. हे संग्रहालय भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारी निवासस्थानात तसेच भोवतालच्या परिसरात विकसित केले आहे. 

तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधान नेहरू यांचे सरकारी निवासस्थान होते. नेहरूंच्या पश्चात काही काळ देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी या निवासस्थानात मुक्काम केला. पुढे काय घडले याबाबत आजही तर्कवितर्क केले जातात. पण शास्त्रींनी तीन मुर्ती भवन येथून त्यांचा मुक्काम दहा जनपथ येथे हलविला जे पुढे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान झाले. काँग्रेसच्या कार्यकाळातच तीन मुर्ती भवन या सरकारी निवासस्थानात पंतप्रधान नेहरू यांच्या आठवणी जतन करण्याचा निर्णय झाला. यानंतर देशाचा एकही पंतप्रधान तीन मुर्ती भवन येथे वास्तव्यास नव्हता. नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर यथावकाश तीन मुर्ती भवन या वास्तूचे रुपांतर पंतप्रधान संग्रहालयात करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या सर्व पंतप्रधानांच्या आठवणी एकाच ठिकाणी जतन करून भारताच्या इतिहासाला उजाळा देण्याचा निर्णय झाला. यानंतर जुन्या आणि नव्या गोष्टींचा सुंदर मिलाफ साधण्यात आला. पूर्वीचे तीन मूर्ती भवन ब्लॉक एक म्हणून तर नव्याने बांधलेली इमारत ब्लॉक दोन म्हणून विकसित करण्यात आली. या दोन्ही ब्लॉक्सचे एकत्रित क्षेत्रफळ १५ हजार ६०० चौरस मीटरपेक्षा जास्त आहे. या भव्य जागेत पंतप्रधान संग्रहालय विकसित करण्यात आले आहे. 

पंतप्रधान संग्रहालय म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळातील भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांना त्यांची विचारसरणी आणि कार्यकाळ यांना गृहीत न धरता वाहिलेली आदरांजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेला हा समावेशक प्रयत्न असून आपल्या सर्व पंतप्रधानांचे नेतृत्व, द्रष्टेपणा आणि त्यांनी केलेली सफल कामगिरी याबद्दल नव्या पिढीला जागृत करून त्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने या संग्रहालयाची उभारणी करण्यात येत आहे.

या संग्रहालयाच्या इमारतीची रचना उदयोन्मुख भारताच्या तसेच स्वहस्ते त्याला आकार देणाऱ्या आणि घडविणाऱ्या नेत्यांच्या कहाणीतून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. या इमारतीच्या संरचनेत शाश्वत आणि उर्जा संवर्धन प्रक्रिया अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाच्या कामादरम्यान एकही वृक्ष तोडण्यात आला नाही किंवा त्याचे प्रत्यारोपण करावे लागले नाही. संग्रहालयाचे बोधचिन्ह म्हणजे देश आणि लोकशाही यांचे प्रतीक असलेले धर्मचक्र पेलणाऱ्या भारतीय जनतेच्या हातांचे प्रतीक आहे.

या संग्रहालयासाठी आवश्यक असणारी माहिती प्रसार भारती, दूरदर्शन, चित्रपट विभाग, सांसद टीव्ही, संरक्षण मंत्रालय, भारतीय तसेच परदेशी माध्यम संस्था, परदेशी वृत्त संस्था इत्यादींकडे असणारे माहितीचे भांडार आणि विविध स्रोत यांच्या माध्यमातून गोळा करण्यात आली आहे. पुराभिलेख दस्तावेजांचा योग्य वापर (संग्रहित कार्य आणि इतर साहित्यविषयक कार्य, महत्वाचे पत्रव्यवहार), काही वैयक्तिक वापराच्या वस्तू, भेट मिळालेल्या वस्तू तसेच आठवणी सांगणारी इतर सामग्री (सत्कार समारंभ, मानसन्मान, मिळालेली पदके, सन्मानार्थ विशेष प्रसंगी प्रकाशित टपाल तिकिटे, नाणी, इत्यादी), पंतप्रधानांची भाषणे आणि विविध विचारधारांचे घटनात्मक प्रातिनिधिक साहित्य तसेच विविध पंतप्रधानांच्या आयुष्यांचे विविध पैलू या संग्रहालयात संकल्पनाधारित स्वरुपात दर्शविण्यात आले आहेत.

या संग्रहालयामध्ये सामग्रीमधील वैविध्य आणि प्रदर्शनाच्या सतत परिभ्रमणाचे भान ठेवून  अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण करण्यात आले आहे. ज्यातून संवादात्मक आणि गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर माहिती सादर होते. होलोग्राम्स, आभासी सत्यता, वर्धित सत्यता, बहु-स्पर्शी, विविध माध्यमे, संवादात्मक किऑस्क, संगणकीकृत गतिजन्य शिल्पे, स्मार्टफोन अॅप्लीकेशन्स, संवाद साधणारे पडदे, अनुभवात्मक संरचना इत्यादींमुळे या प्रदर्शनातील साहित्य मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांशी संवाद साधणारे आणि त्यांना गुंतवून ठेवणारे झाले आहे.

या संग्रहालयात एकूण ४३ दालने आहेत. स्वातंत्र्य लढ्यावर तसेच घटनेच्या रचनेवर आधारित काही माहितीच्या सादरीकरणापासून सुरू होऊन हे संग्रहालय आपल्याला, अनेकानेक  पंतप्रधानांनी विविध आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपल्या देशाला योग्य  दिशा कशी दाखवली आणि देशाची सर्वांगीण प्रगती कशी सुनिश्चित केली याची कथा सांगते.   

असेही राजकारण!

स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत १९५२ मध्ये हरले होते. नारायण सदोबा काजरोळकर यांनी दीर्घ काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहाय्यक म्हणून काम केले. पण काँग्रेसने उमेदवारी दिली आणि काजरोळकर यांनी लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ (Mumbai North Central Lok Sabha constituency) येथे झालेल्या निवडणुकीत काजरोळकर यांना १ लाख ३८ हजार १३७ मते मिळाली होती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १ लाख २३ हजार ५७६ मते मिळाली होती. निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेचौदा हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीसाठी काजरोळकर यांच्या पाठिशी मोठी आर्थिक ताकद होती असे सांगतात. ही ताकद देशाच्या पहिल्या पंतप्रधानांच्या सूचनेनंतर उभी राहिली होती असे म्हणतात. आज या गोष्टींमधील खरेखोटेपणा तपासणे कठीण आहे. पण 'ज्या आंबेडकरांना नेहरूंनी हरवले त्यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन होत आहे. फक्त नेहरूंचे निवासस्थान म्हणून ओळखली जाणारी जागा आता पंतप्रधान संग्रहालय म्हणून ओळखली जाणार. हे सर्व नरेंद्र मोदी घडवून आणणार...' अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी