पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा भूतान दौऱ्यावर, या मुद्द्यावर करणार चर्चा 

India Bhutan: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट महिन्यात शेजारचा देश भूतानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर मोदींनी आपला पहिला परराष्ट्र दौऱ्यासाठी भूतानची निवड केली होती.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा भुतान दौऱ्यावर, या मुद्द्यावर करणार चर्चा   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भूतान दौऱ्यावर
  • ऑगस्ट महिन्यात मोदींचा दोन दिवसीय भूतान दौरा
  • भूतान आणि भारताचे खास संबंध

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट महिन्यात भूतानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींचा हा दोन दिवसीय दौरा असेल. पंतप्रधान मोदी यांनी भूतानचा हा दुसरा अधिकृत दौरा असेल. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या परराष्ट्र दौऱ्यासाठी भूतान या देशाची निवड केली होती. पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा भूतानसोबत भारतासोबत असलेल्या संबंधांचं महत्त्व सांगण्याबद्दल असेल. यासोबतच या दौऱ्यातून भारत देश हे सांगेल की, त्यांच्यासाठी नेबरहुड पॉलिसी खूप महत्त्वाची आहे. भूतानचे भारतासोबत खास नातं आहे. गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकरनं भूतानचा दोन दिवसीय अधिकृत दौरा केला. परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जयशंकर यांचा हा पहिला परराष्ट्र दौरा होता. या दौऱ्यादरम्यान परराष्ट्र मंत्र्यांनी भूतानचे पंतप्रधान लोताय त्सेरिंग यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या संधीवर चर्चा केली. 

भूतानचे भारतासोबत आहेत खास संबंध 

दशकांपासून भारत आणि भूतानचे संबंध खास आहेत. भूतान एक छोटा देश असल्यानं भारत त्या देशाला नेहमीच सन्मान देत आला आहे. अलीकडच्या काळात या हिमालयी देशासोबत भारताचे संबंध आणखीन मजबूत झाले आहेत. १९६८ मध्ये भूतानसोबत राजकीय संबंध स्थापित झाले आणि त्यानंतर दोन्ही देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि व्यावसायिक संबंधांनी एक उंची गाठली आहे.भारत आणि भूतान यांच्या संबंधांतील मूलभूत आधार 1949 मध्ये अस्तित्त्वात आलेली ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप अॅड कोऑपरेशन आहे.  फेब्रुवारी 2007 मध्ये ही संधी पुन्हा परिभाषित करण्यात आली. २०१८ मध्ये राजकीय संबंधांना ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांनी या खास नात्याचं सुवर्ण जयंती साजरी केली. 

Bhutan PM Modi

योजनाबद्ध रूपानं महत्त्वाचा आहे भूतान 

भूतानची भौगोलिक संरचना आणि त्याची स्थिती भारतासाठी आणखीन खास बनवते. उत्तरपूर्व भारतातील काही राज्यांची सीमा भूतानला येऊन मिळते. भूतानच्या सीमेतील एक मोठा भूभाग चीनच्या सीमेशी देखील जोडतो. चीननं हल्लीच काही वर्षांत भूतानमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे भारत सतर्क झाला आहे. या शांतीप्रिय देशात चीन नियुक्त व्हावं अशी भारताची बिल्कुल इच्छा नाही आहे. चीनच्या विस्तारवादी योजनेमुळे त्यांचे शेजारील देश त्रस्त आहे. चीनची नजर भूतानवर देखील आहे. चीन भूतानच्या माध्यमातून उत्तरपूर्व राज्याच्या जवळ येऊन भारतावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र त्यांचा प्रत्येक प्रयत्न भारत हाणून पाडत आला आहे. 

PM Modi in Bhutan

२०१७ मध्ये डोकलाममध्ये चीननं केलं अतिक्रमण 

२०१७ मध्ये चीननं भूतानच्या सीमेवर अतिक्रमण करत डोकलाममध्ये रस्ता बनवण्याचं काम सुरू केलं. डोकलामचा एक भाग भूतानच्या क्षेत्रात येतो. चीनच्या या निर्णयाचा पहिला भूताननं नंतर भारतानं विरोध केला. योजनाबद्ध रूपानं डोकलाम भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. डोकलाममध्ये चीनचं नियंत्रण झाल्यास भूतानसोबतच भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. डोकलाममद्ये आपआपल्या दाव्यामुळे भारत आणि चीनमध्ये कोंडी निर्माण झाली. दोन्ही देशांमध्ये तणावाचा स्तर युद्धापर्यंत पोहोचला होता. मात्र राजनैतिक प्रयत्नानंतर तणावाचा स्तर ७२ दिवसांनंतर समाप्त झाला. भारताच्या विरोधानंतर चीनला डोकलाम क्षेत्रात आपला रस्ता बनवण्याचं काम बंद करावं लागलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा भूतान दौऱ्यावर, या मुद्द्यावर करणार चर्चा  Description: India Bhutan: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट महिन्यात शेजारचा देश भूतानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर मोदींनी आपला पहिला परराष्ट्र दौऱ्यासाठी भूतानची निवड केली होती.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता