राजकारण बाजूला ठेऊन मोदी देणार महाराष्ट्राला मदत - उद्धव ठाकरे 

राजकारणात वेगळी भूमिका असली तरी देशातील एक राज्य म्हणून केंद्र सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी जी काही मदत असेल ती द्यायला तयार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्ध

pm narendra modi cm uddhav thackeray meet in new delhi first time
राजकारण बाजूला ठेऊन मोदी देणार महाराष्ट्राला मदत - उद्धव ठाकरे   |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली :  राजकारणात वेगळी भूमिका असली तरी देशातील एक राज्य म्हणून केंद्र सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी जी काही मदत असेल ती द्यायला तयार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा उद्धव ठाकरे नवी दिल्लीत आले आहेत. त्यांनी यावेळी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास बैठक झाली. या बैठकीपूर्वी फोटो सेशन झाले, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांनी सुमारे अर्धातास वन टू वन बैठक केली. त्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे या बैठकीत सामील झाले. त्यांनी आपल्या खात्यासंबंधी काही माहिती आणि विषय पंतप्रधानांसमोर मांडले. त्यानंतर राज्याला आवश्यक असलेल्या प्रश्नांबाबत मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शेवटच्या १५ मिनिटात पंतप्रधानांशी चर्चा केली. 

या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर जाऊन पत्रकारांशी बातचित केली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  आजपर्यंत मी अनेकवेळा दिल्लीत आलो होतो. पण राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जेव्हापासून पदभार स्वीकारला आहे. तेव्हापासून पहिल्यांदा दिल्लीत आलो आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आमच्यात चांगली चर्चा झाली. महाराष्ट्राच्या आवश्यकतेवर चर्चा झाली. आवश्यकता म्हणजे अडचणी नाही.  त्यावर आमची राजकीय भूमिका काहीही असली तरी देशातील एक राज्य म्हणून केंद्र सरकार महाराष्ट्राला आवश्यक ती मदत करणार असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

यावेळी सीएए, एनआरसी आणि एनपीआर संदर्भातही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, मी यापूर्वीच माझ्या सामनातील दीर्घ मुलाखतीत सांगितले होते की सीएएमुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही.  तर केंद्राने यापूर्वीच संसदेत स्पष्ट केले आहे की देशात एनआरसी लागू होणार नाही.  तसेच एनपीआर हे जनगणनेप्रमाणे आहे. देशात दर दहा वर्षांनंतर जनगणना होते. तशी ती होणार आहे. त्यात प्रश्नावली तपासण्यात येईल. त्यात आक्षेपार्ह असेल तर त्याला नक्कीच विरोध करण्यात येईल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

एनआरसीबाबत मी राज्यातील जनतेला स्पष्ट केले आहे की, कोणीही कोणाच्या हक्कावर गदा आणणार नाही आणि मी ती आणू देणार नाही. एनपीआरच्या माध्यमातून कोणालाही देशातून बाहेर काढण्यात येणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

महाराष्ट्राला जीएसटीचे येणारे पैसे कमी वेगाने येतात. त्याबद्दलही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  राज्यात येत्या मार्च महिन्यात शेतकरी कर्ज मुक्त करणार आहोत. त्यासाठी पैशाची गरज आहे. ती केंद्राकडून जीएसटी कलेक्शनच्या रुपातून आली तर आम्हांलाही राज्याच्या भल्यासाठी ज्या योजना आहेत. त्या करता येतील असेही पंतप्रधानांना सांगितले. तसेच राज्यात पंतप्रधान पीक योजनेत १० जिल्ह्यात एकही कंपनी नाही आहे. त्यावरही पंतप्रधानांचे लक्ष वेधल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...