Narendra Modi daily expenses: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाण्यावर किती रुपये खर्च करतात? याची माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आली होती. त्यानंतर आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाण्यावर किती रुपये खर्च होतो आणि तो खर्च कोण करतं? या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. (PM Narendra Modi food expenses rti reveals that government not pay anything modi himself pays it read in marathi)
आरटीआयला अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय अवर सचिव यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेवणावर सरकारी बजेटमधून एक रुपया देखील खर्च केला जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपलब्ध करुन दिल्या जात असलेल्या सर्व सुविधांचा खर्च हा सरकारी बजेटमधून केला जात नाही.
हे पण वाचा : राजकारण्यांचे बाप्पा; पाहा नेत्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाण्यावर सरकारी बजेटमधून एकही रुपया खर्च केला जात नाही मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या खाण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा भार उचलतात. याआधीही पंतप्रधानांच्या कपड्यांवरील खर्चाबाबत आरटीआय दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पीएमओने सांगितले होते की, पंतप्रधान स्वत: त्यांच्या कपड्यांचा खर्च सुद्धा करतात.
हे पण वाचा : मुंबईपासून ते न्यूयॉर्क, लंडन अन् दुबईपर्यंत आहे अंबानींची संपत्ती
2015 मध्ये एका आरटीआय अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाण्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर माहिती अधिकाऱ्यांनी उत्तर दिले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजराती खाद्यपदार्थ खायला आवडतात. ते कूकने बनवलेले खाद्य खातात. बाजरीची रोटी आणि खिचडी खाण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राधान्य देतात.
2015 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानक संसद भवनाच्या कॅन्टीनमध्ये दाखल झाले आणि सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी त्यांनी आरओचं पाणी सुद्धा घेतले. तसेच शाकाहारी जेवणाची थाळी घेत त्यासाठीचे 29 रुपये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.