PM Narendra Modi gets highest approval rating among global leaders, finds US survey : नवी दिल्ली : अमेरिकेतील 'द मॉर्निंग कन्सल्ट' या डेटा इंटेलिजन्स फर्मचा जगातील प्रमुख नेत्यांच्या लोकप्रियतेविषयीचा ताजा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील इतर नेत्यांना मागे टाकले आहे.
'द मॉर्निंग कन्सल्ट'ने लोकप्रियतेआधारे प्रत्येक देशाच्या प्रमुख नेत्याला अप्रुव्हल रेटिंग दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ७१ टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळाले आहे.
'द मॉर्निंग कन्सल्ट'चे रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या सात दिवसांच्या सरासरी सर्वेक्षणावर आधारित आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या शेवटच्या सर्वेक्षणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्वाधिक होती.
अप्रुव्हल रेटिंगनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या स्थानी तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन सहाव्य स्थानी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन तेराव्या स्थानी आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी- ७१ टक्के
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर- ६६ टक्के
इटलीच्या पंतप्रधान मारिया द्राघी- ६० टक्के
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा- ४८ टक्के
जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ- ४४ टक्के
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन- ४३ टक्के
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो- ४३ टक्के
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन- ४१ टक्के
स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ- ४० टक्के
कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ए- ३८ टक्के