PM Modi in Italy: पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात तासभर चर्चा

pm narendra modi in italy meeting with Pope Francis in vatican city भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकन सिटी येथे भेट झाली. ही भेट आधी फक्त वीस मिनिटांची असेल असे ठरले होते. पण तासभर दोघांच्यात चर्चा झाली.

pm narendra modi in italy meeting with Pope Francis in vatican city
पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात तासभर चर्चा 
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात तासभर चर्चा
  • पोपशी चर्चा करणारे मोदी हे भारताचे पाचवे पंतप्रधान
  • पंतप्रधान मोदींच्या इटली दौऱ्याचा आज दुसरा दिवस

pm narendra modi in italy meeting with Pope Francis in vatican city । नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकन सिटी येथे भेट झाली. ही भेट आधी फक्त वीस मिनिटांची असेल असे ठरले होते. पण तासभर दोघांच्यात चर्चा झाली. प्रदूषण, वातावरणातील बदल, गरीबीच्या निर्मूलनाबाबत चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. याआधी १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पोप जॉन पॉल द्वितीय यांनी भारताला भेट दिली होती. यानंतर अद्याप पोपचा भारत दौरा झालेला नाही.

याआधी व्हॅटिकन सिटीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे जोषात स्वागत झाले. पंतप्रधान आणि पोप फ्रान्सिस यांची पहिल्यांदाच भेट झाली. याआधी दोघेही एकमेकांना कधी भेटले नव्हते. व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पण उपस्थित होते. पंतप्रधानांनी व्हॅटिकन सिटीचे परराष्ट्रमंत्री कार्डिनल पिएत्रो पारोलिन यांचीही भेट घेतली. 

पोपशी चर्चा करणारे मोदी हे भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत. याआधी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी या चार पंतप्रधानांनी तत्कालीन पोपशी चर्चा केली होती. 

जी २० परिषदेला उपस्थित राहण्याच्या निमित्ताने इटलीच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट दिली. रोममध्ये पंतप्रधान मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांची भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांशी चर्चा केली तसेच दोन्ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली भारत आणि इटलीच्या शिष्टमंडळाने काही मुद्यांवर चर्चा केली. यात परस्पर सहकार्य, वातावरणातील बदल, प्रदूषण, अपरंपरागत स्त्रोतांद्वारे ऊर्जेची निर्मिती हे प्रमुख विषय होते. 

पंतप्रधान मोदींच्या इटली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज रोममध्ये जी २० परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान सदस्य देशांच्या नेत्यांसोबत स्वतंत्रपणे चर्चा करतील. इंडोनेशिया, फ्रान्स, सिंगापूर या तीन देशांच्या नेत्यांसोबतच्या पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भेटींमध्ये प्रामुख्याने कोरोना संकट, आर्थिक सहकार्य, जागतिक आव्हाने, संरक्षण सहकार्य या विषयांवर चर्चा होईल.

याआधी शुक्रवारी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी इटलीत स्थायिक असलेल्या भारतीयांची भेट घेतली. इटालियन हिंदू युनियन, द इटालियन कांग्रेशन फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, शीख संघटना यांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. महायुद्धात इटलीमध्ये लढताना बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ काम करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. भारतीयांसोबत झालेल्या भेटीत अनेकांनी उत्साहाने जय श्रीराम अशा घोषणा देत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. इटलीत मराठी आणि गुजराती भाषेतही पंतप्रधान मोदी यांचे स्वागत झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी