राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, अस्वच्छतेविरोधात भारत छोडोचा नारा

Rashtriya Swachhata Kendra: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत 'स्वच्छ भारत अभियाना' अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन केलं आहे. 

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
  • राष्ट्रीय स्वच्छता केंद्र हे महात्मा गांधींना कायमस्वरूपी श्रद्धांजली म्हणून समर्पित : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • अस्वच्छतेच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला नारा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी (८ ऑगस्ट २०२०) रोजी देशाची राजधानी दिल्लीत 'स्वच्छ भारत अभियाना' अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं (Rashtriya Swachhta Kendra) उद्घाटन केलं. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात आलेल्या या केंद्रात स्वच्छ भारत मिशनचे यश आणि स्वच्छतेचे फायदे या संदर्भात नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महात्मा गांधी यांनी आजच्या दिवशीच स्वातंत्र्य लढ्याची सुरूवात केली होती. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वच्छतेला भारतातून बाहेर काढण्यासाठी 'गंदगी भारत छोडो' (अस्वच्छतेच्या विरोधात भारत छोडो) चा नारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएसके म्हणजेच राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन केलं आहे. महात्मा गांधी यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० एप्रिल २०१७ रोजी महात्मा गांधींच्या चंपारण सत्याग्रह शताब्दी समारंभाच्या निमित्ताने केली होती.

महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरोधात भारत छोडो नारा देत आंदोलनाला सुरूवात केली. या विचारसरणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वच्छतेविरोधात भारत छोडाचा नारा देत राष्ट्रीय स्वच्छता केंद्र सुरू केले. स्वच्छतेला एक प्रकारची चळवळ बनवणाऱ्या भारतीय नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. तसेच कोरोना विषाणू विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत स्वच्छतेचं महत्व पुन्हा एकदा सांगितलं आहे.

(फोटो सौजन्य: पीआयबी ट्वीटर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वच्छेतेच्या विरोधात भारत छोडोचा नारा दिला. तसेच ही 'गंदगी मुक्त भारत' मोहीम आठवडाभर सुरू राहणार असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात स्वच्छतेच्या संदर्भात विशेष अभियान आणि उपक्रम राबवण्याचं काम केलं जाणार आहे.

राष्ट्रीय स्वच्छता केंद्र हे ९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळपासून हे नागरिकांसाठी सुरू होणार आहे. हे केंद्र सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत खुले असणार आहे. राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे तिकिट रिझर्व्हेशन आणि संपूर्ण माहितीसाठी http://rsk.ddws.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देवून अधिक माहिती मिळवता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी