पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा: तिन्ही दलांसाठी 'चीफ ऑफ डिफेन्स' पद प्रमुखाची नेमणूक

भारताचा आज ७३ व्या स्वातंत्र्य दिन आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मोदींनी सहाव्यांदा देशाला संबोधित केलं. यावेळी  मोदींनी आपल्या भाषणात एक मोठी घोषणा केली आहे.

Prime Minister Narendra Modi meets security force
समन्वय राखण्यासाठी तिन्ही दलांवर एक प्रमुख नेमणार   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • आज ७३ वा स्वातंत्र्य दिन
  • ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह
  • पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मोठी घोषणा

नवी दिल्लीः आज भारत देश ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण करून देशाला सहाव्यांदा संबोधित केलं. यावेळी मोदींनी दीड तासाचं भाषण देखील केलं आहे. या भाषणादरम्यान मोदींनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. यातच मोदींनी आपल्या भाषणा दरम्यान मोठी घोषणा केली आहे. देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांत समन्वय राखण्यासाठी या तिन्ही दलांवर एक प्रमुखाची नेमणूक करण्यात येणार असल्याच मोदींनी स्पष्ट केलं आहे. 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असं या पदाला नाव देण्यात आलं आहे. या पदावरील व्यक्ती तिन्ही दलांचं नेतृत्व देखील करेल असंही मोदींनी म्हटलं आहे. मोदी म्हणाले की, देशाची सुरक्षा दल हा आपला अभिमानं आहे. तिन्ही दल आणखीन मजबूत करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सध्याची बदलती परिस्थितीत तिन्ही दलांमधील समन्वय वाढवणं गरजेचं आहे. यासाठीच सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वयक म्हणून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केलं जाईल. तसंच या पदावरील व्यक्ती तिन्ही सैन्य दलाची प्रभारी म्हणून काम करेल, असंही मोदींनी सांगितलं आहे.  तसंच या निर्णयानंतर संरक्षण दल अधिक सक्षम होतील असंही मोदींनी म्हटलं. 

मोदींनी ही मोठी घोषणा करत पुढे म्हटलं की, तिन्ही सुरक्षा दलात समन्वय राखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्ससारखं पद असावं, अशी शिफारस सुरक्षाविषयक अनेक समित्यांनी केली होती. मात्र त्यावर आजपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर आज म्हणजेच १५ ऑगस्टच्या निमित्तानं मोदींनी याबाबत मोठी घोषणा केली. 

दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारत करणार पर्दाफाश 

मोदींनी आपल्या भाषणात दहशतवादावरही भाष्य केलं. यावेळी मोदी म्हणाले की, दहशतवाद पोसणाऱ्यांच्या भारताकडून पर्दाफाश केला जातोय. तसंच आज केवळ भारत देशच नाही तर श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान हे देश देखील दहशतवाद्यांशी लढत आहेत. अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्यांना, मदत करणाऱ्यांना शिक्षा होणार असल्याचं सांगत शेजारील देशही दहशतवादाशी लढा देत असल्याचं मोदींनी म्हटलं. दहशतवादाविरोधात देश सध्या कठोर लढा देतोय. 

याव्यतिरिक्त मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच येत्या ५ वर्षांत मोदी सरकारचं काय धोरण आणि योजना असतील याबद्दल ही माहिती दिली. यावेळी अनेक योजनांची घोषणा मोदींनी केली. कलम ३७० आणि तिहेरी तलाक विधेयकांवर बोलताना मोदींनी विरोधकांना टोला लगावला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा: तिन्ही दलांसाठी 'चीफ ऑफ डिफेन्स' पद प्रमुखाची नेमणूक Description: भारताचा आज ७३ व्या स्वातंत्र्य दिन आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मोदींनी सहाव्यांदा देशाला संबोधित केलं. यावेळी  मोदींनी आपल्या भाषणात एक मोठी घोषणा केली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता