Satya Pal Malik : पंतप्रधान नरेंद्र मोदी घमेंडी, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा केंद्र सरकारवर घाणाघात

Satya Pal Malik पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घमेंडी आहेत असे विधान मेघालय राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला त्यावरून आपले आणि पंतप्रधान मोदींचे वाद झाले असेही मलिक म्हणाले. 

थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घमेंडी आहेत
  • शेतकरी आंदोलनावरून आपले आणि पंतप्रधान मोदींचे वाद
  • पंतप्रधान मोदींना चुकीचा फीडबॅक

Satya Pal Malik : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घमेंडी आहेत असे विधान मेघालय राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला त्यावरून आपले आणि पंतप्रधान मोदींचे वाद झाले असेही मलिक म्हणाले. 

सत्यपाल मलिक हरयाणातील दादरी येथील एका धार्मिक ठिकाणी भेट द्यायला आले होते. तेव्हा मलिक म्हणाले की, शेतकरी आंदोलनाबाबात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. परंतु पंतप्रधान मोदी हे अतिशय घमेंडी आहेत. मी त्यांना म्हटले की शेतकरी आंदोलनात ५०० शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा मोदी म्हणाले की माझ्यासाठी मेले का? तेव्हा मलिक यांनी हो तुमच्यामुळेच मेले असे म्हणाले. तसेच कारण तुम्ही राजा झाले आहात असेही मलिक यावेळी म्हणाले. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्यात वाद झाला असेही मलिक म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला सांगिले. तेव्हा मलिक यांनी शहा यांची भेट घेतली तेव्हा शहा म्हणाले की पंतप्रधान मोदींना चुकीचा फीडबॅक दिला आहे. त्यांना लवकरच सर्व काही समजेल असे शहा यांनी मलिक यांना सांगितले.

पुन्हा शेतकरी आंदोलन होण्याची शक्यता

राज्यपाल मलिक म्हणाले की अजूनही शेतकरी आंदोलन संपले नसून स्थगित झाले आहे. शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे आणि अत्याचार झाला आहे. केंद्र सरकारने शेतकर्‍यांना किमान हमी भावाची कायदेशीर हमी द्यावी, सरकारने शेतकर्‍यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत अशी मागणी मलिक यांनी केली. तसेच शेतकर्‍यांसाठी आपल्याला राज्यपालपद सोडावे लागले तरी चालेल असेही मलिक म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी