Pm Modi Meeting : कोरोना संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक, गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची हजेरी

PM Modi Meeting देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. आज दिवसभरात देशात कोरोनाचे एक लाख ५९ हजार रुग्ण आढळले आहेत. तर ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली आहे.

थोडं पण कामाचं
  • देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे.
  • दिवसभरात देशात कोरोनाचे एक लाख ५९ हजार रुग्ण आढळले आहेत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली आहे.

PM Modi Meeting corona crisis : नवी दिल्ली : देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. आज दिवसभरात देशात कोरोनाचे एक लाख ५९ हजार रुग्ण आढळले आहेत. तर ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. (PM narendra Modi meeting to review COVID-19 situation in country today)


अजूनही कोरोना संपला नाही, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या बैठकीत दिल्या ह्तोया. तेव्हापासून भारात कोरोना रुग्णांची संख्या वाढून सहा लाख रुग्णांच्या घरात गेली आहे. सध्या देशात पुन्हा कोरोना वाढत असून सामान्य नागरिक, आरोग्य कर्मचारी, सामान्य नागरिक, संसदेचे कर्मचारी, न्यायालयाचे कर्मचारी आणि न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबईतही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 


दिल्ली, मुंबई, बेंगळुरू सारख्या महानगरांमध्ये कोरोनाची संख्या वाढत आहे. रविवारी देशात कोरोनाचे १ लाख ५९ हजार रुग्ण आढळले आहेत. गेल्या २२४ दिवसांत हा सर्वात मोठा आकडा आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाखांवर पोहोचली आहे. ही संख्या गेल्या १९७ दिवसांपैकी सर्वाधिक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतील. रविवारी कोविडचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे ५५२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजार ६२३ इतकी झाली आहे. 
गेल्या २४ तासांत ३२७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४ लाख ८३ हजार ७९० इतकी झाली आहे. ओमिक्रॉनच्या ३ हजार ६२३ रुग्णांपैकी १ हजार ४०९ रुग्ण देशाबाहेर गेले आहेत किंवा बरे झाले आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे सर्वाधिक म्हणजेच १००९ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत ५१३, कर्नाटाकात ४४१, राजस्थान ३७३, केरळ ३३३ आणि गुजरामध्ये २०४ रुग्ण आढळले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी