Hiraben Modi hospitalised: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिराबेन यांना रूटीन चेकअपसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे.हिराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल हे हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. (PM Narendra Modi mother Hiraben hospitalised in Ahmedabad gujarat read in marathi)
गेल्या 18 जून रोजी हिराबेन यांनी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अहमदाबाद येथे पोहोचले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेत त्यांच्यासोबत पूजा सुद्धा केली होती. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हिराबेन मोदी यांनी आपल्या मतदानाचा हक्कही बजावला होता.
हे पण वाचा : नववर्षात करा हे घरगुती उपाय, झटक्यात व्हाल मालामाल
#BreakingNow: पीएम मोदी की मां हीराबेन की तबीयत बिगड़ी, अहमदाबाद के यूएन मेहता अस्पताल में हीराबेन को कराया गया भर्ती — Times Now Navbharat (@TNNavbharat) December 28, 2022
ज्यादा जानकारी दे रहे हैं संवाददाता सिद्धार्थ पांड्या @AnchorAnurag #Gujarat #PMModi #Heeraben pic.twitter.com/r9EfIlBML9
असं म्हटलं जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारच्या सुमारास आई हिराबेन मोदी यांना भेटण्यासाठी अहमदाबाद येथे जाण्याची शक्यता आहे. हिराबेन मोदी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रशासनाकडून रुग्णालय परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
हे पण वाचा : मड थेरपी करण्याचे अनेक फायदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या गाडीचा मंगळवारी अपघात झाला. प्रल्हाद मोदी हे आपल्या कुटुंबासोबत जात होते तेव्हा कर्नाटकमध्ये हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये प्रल्हाद मोदी यांचा मुलगा, सून आणि त्यांची पत्नी सुद्धा होती. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात त्यांचा मुलगा आणि सून यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन गाड्या एकमेकांना धडकल्यानंतर हा अपघात झाला.