दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २३ ऑगस्ट २०१९: पंतप्रधान मोदींचं भाषण ते स्मार्टफोनसाठी १० लाख रजिस्ट्रेशन

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

top 5 news_latest news_times now marathi
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २३ ऑगस्ट २०१९: पंतप्रधान मोदींचं भाषण ते स्मार्टफोनसाठी १० लाख रजिस्ट्रेशन  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आजची दिवसभरातील पहिली बातमी आहे ती फ्रान्समधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणासंदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसाच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तेथील भारतीयांशी संवादही साधला. दुसरी महत्त्वाची बातमी पाकिस्तानला आता प्रचंड मोठा झटका बसला आहे. कारण की, टेरर फंडिंगवर नजर ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था फाइनेंशियल एक्शन टाक्स फोर्स (FATF)च्या प्रादेशिक युनिट एशिया पॅसिफिक गट (एपीजी) ने पाकिस्तानला थेट 'काळ्या यादी'त टाकलं आहे. तिसरी महत्त्वाची बातमी, ईडीनं राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहाराप्रकरणी नोटीस पाठविल्यानंतर आता महाराष्ट् नवनिर्माण सेनेने चक्क ईडीलाच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नोटीस पाठवली आहे. चौथी महत्त्वाची बातमी, मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासांवरून शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आज चार वर्ष होऊनही त्याबाबत काहीच निर्णय किंवा अमंलबजावणी करण्यात आली नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.  पाचवी महत्त्वाची बातमी, रेडमी नोट 8 या स्मार्टफोन सीरिजसाठी प्री रजिस्ट्रेशनची घोषणा केल्यानंतर एका दिवसात या सीरिजच्या फोनसाठी रजिस्ट्रेशनचा आकडा 10 लाखांहून अधिक झाला आहे. या पाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींचं जबरदस्त भाषण, पाहा भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे:  भारताचे पंतप्राधन नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना तेथे राहणाऱ्या भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी बऱ्याच गोष्टीं स्पष्ट केल्या. बातमी सविस्तर वाचा.

पाकिस्तानची वाट लागली, एफएटीएफच्या आशिया पॅसेफिक ग्रुपने थेट 'काळ्या यादी'त टाकलं: पाकिस्तानला आज (शुक्रवार) मोठा धक्का बसला आहे. कारण आज त्यांना एपीजी या संस्थेने थेट काळ्या यादीत टाकलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. बातमी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

मनसेनेच दिली  चक्क 'ईडी'ला दिली नोटीस, सोशल मीडियावर मनसेच्या कल्पतेचे कौतुक: अॅक्शनला रिअॅशन देणे हे मनसेचा स्थायी भाव आहे, याचा नमुना आज पाहायला मिळाला. ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर आता मनसेने ईडीलाच नोटीस पाठवली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा:  शिवसेना नेता आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. म्हाडा कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलते होते. बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

Xiaomi या स्मार्टफोनसाठी एका दिवसात तब्बल 10 लाख रजिस्ट्रेशन:  शाओमी 29 ऑगस्टला आपल्या नवीन स्मार्टफोन सीरिज रेडमी नोट 8 लॉन्च करेल. या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन रेडमी नोट 8 आणि रेडमी नोट 8 प्रो लॉन्च होतील. ज्यासाठी लोकं आतुरतेनं वाट पाहत आहेत. बातमी वाचा येथे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...