VIDEO: अनवाणी चालत मोदींनी केली समुद्र किनाऱ्याची साफसफाई, ट्विटरवर व्हिडिओ शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी आज सकाळी महाबलीपुरम (Mamallapuram)समुद्रावर अनवाणी चालत साफसफाई केली आहे. याचा एक व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर शेअर केला आहे.

PM Modi
VIDEO: अनवाणी चालत मोदींनी केली समुद्र किनाऱ्याची साफसफाई  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी सकाळी तामिळनाडूच्या महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
  • पंतप्रधान मोदींनी या किनाऱ्यावर साफसफाई केली आहे.
  • ट्विटरवर पंतप्रधान मोदींनी स्वच्छता अभियानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

चेन्नईः  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी सकाळी तामिळनाडूच्या महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छतेचा संदेश दिला आहे. पंतप्रधान मोदींनी या किनाऱ्यावर साफसफाई केली आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदींनी स्वच्छता अभियानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मोदींनी लिहिलं की, अनवाणी चालत जात सफाई केली. याचा एक व्हिडिओ पंतप्रधानांनी ट्विटरवरही शेअर केला. समुद्रावर मॉर्निंग वॉक करताना मोदींनी किनाऱ्यावरील कचरा उचलला. 

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पंतप्रधान मोदी विना चप्पलचे समुद्र किनाऱ्यावर पडलेला कचरा, प्लास्टिक बॉटल उचलून खांद्यावरून घेऊन जात आहेत. यासोबतच मोदींनी हॉटेल कर्मचाऱ्यांनाही स्वच्छतेचा संदेश दिला. आज या समुद्रावर मोदींनी जवळपास अर्धा तास मॉर्निग वॉक केला. 

पंतप्रधानांनी अशा स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेण्याची ही पहिली वेळ नाही आहे. पंतप्रधान मोदींनी याचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं की, आज सकाळी महाबलीपुरममध्ये एका समुद्र किनारी मॉर्निंग वॉकच्या दरम्यान कचरा उचलला. येथे 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वॉक केला. हा कचरा मी हॉटेल कर्मचारी जयराज यांच्या हातात स्वाधीन केला. आपल्याला सुनिश्चित करायला हवं की, आपले सार्वजनिक स्थान स्वच्छ सुंदर राहिले पाहिजे. चला आपण हे सुद्धा सुनिश्चित करूया की आपण तंदुरूस्त आणि निरोगी राहू. 

पंतप्रधान मोदींनी यानिमित्तानं लोकांना स्वच्छतेसाठी प्रेरणा दिली आहे. सरकारद्वारे सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची जागतिक मंचावर बरीच स्तुती करण्यात आली आहे. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता ही सेवा मिशन या अंतर्गत स्वतः झाडू उचलून दिल्लीच्या पहाडगंजमधल्या बाबासाहेब आंबडेकर उच्च माध्यमिक विद्यापीठात सफाई केली होती. सफाईच्या वेळी पंतप्रधानांनी झाडू सोडून स्वतःच्या हातानं प्लास्टिकच्या प्लेट आणि कचरा गोळा केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी