Anti CAA Protest: नागरिकत्व कायद्यावरील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

Anti Citizenship Amendment Act (CAA) Protests in Northeast, Delhi UPDATES: देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. हे दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

PM Modi
नागरिकत्व कायद्यावरील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया 

थोडं पण कामाचं

  • देशातील विविध भागात नागरिकता दुरूस्ती कायद्याबाबत बराच गोंधळ सुरू आहे.
  •  रविवारी दिल्लीतल्या जामिया विद्यापीठ परिसरात आंदोलकांनी जाळपोळ केली.
  • दक्षिण दिल्लीकडील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

Citizenship Amendment Act (CAA) Protests in Northeast, Delhi UPDATES:  देशातील विविध भागात नागरिकता दुरूस्ती कायद्याबाबत बराच गोंधळ सुरू आहे.  रविवारी दिल्लीतल्या जामिया विद्यापीठ परिसरात आंदोलकांनी जाळपोळ केली. मात्र आता तेथील परिस्थिती सामान्य आहे. खबरदारी म्हणून दक्षिण दिल्लीकडील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दिल्ली वाहतूक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कालिंदी कुंज म्हणजेच रोड नंबर 13 ए सरिता विहार हा रोड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशाच्या विविध भागात होणाऱ्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मोदी म्हणाले की, हे दुर्दैवी आहे. जर कोणत्याही विषयावर मतभेद असतील तर त्यावर मात करण्यासाठी संवाद हे एक चांगले माध्यम आहे आणि प्रत्येकानं त्याच मार्गाने जावं.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आलं. बहुतेक खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला. या कायद्यात भारताच्या प्राचीन संस्कृतीची झलक आहे ज्यात आपण सुसंवाद, दयाळूपणे, बंधुता आणि स्वीकृती या परंपरेला स्थान दिले आहे. तो सर्वांना विश्वास देतो की कोणत्याही भारतीय नागरिकाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा फक्त त्यांच्यासाठी आहे जो धार्मिक छळामुळे भारतात आले आहेत.

कॉंग्रेसने केंद्र सरकारला घेराव घातला

कॉंग्रेसचे गटनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, देशात जे घडत आहे त्यास सरकारचे धोरण जबाबदार आहे. जर भारत सरकारनं हे विधेयक आणले नसते तर जे काही होत आहे ते झाले नसते. यासोबतच त्यांनी म्हटलं की, जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठाच्या ग्रंथालयात जे काही झालं त्यासाठी केंद्र सरकारचं पूर्णपणे जबाबदार आहे. 

ममता बॅनर्जी उतरल्या रस्त्यावर 

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्यात. त्यांनी या कायद्याच्या विरोधात पदयात्रा काढली. त्याच बरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, राज्यातील बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्थेची मला चिंता आहे, परिस्थिती सामान्य करणं हे पहिलं प्राधान्य आहे, त्यांनी यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी