चांद्रयान-२ यशस्वी प्रक्षेपण: 'हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण', पंतप्रधान मोदींनी शेअर केले फोटो

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 22, 2019 | 17:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

चांद्रयान-२ आज यशस्वी प्रक्षेपण झालं. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. तसंच हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचंही म्हटलं आहे.

modi twitter
'हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण', मोदींनी शेअर केले फोटो  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • चांद्रयान-२ यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचं केलं कौतुक
  • पंतप्रधान मोदींनी शेअर केले प्रक्षेपणाचे फोटो
  • चांद्रयान-२ मुळे चंद्राबाबत नवी माहिती मिळणार

नवी दिल्ली: भारताचं बहुप्रतिक्षित चांद्रयान-२ या अंतराळ यानाचं आज (सोमवार) यशस्वीरित्या प्रक्षेपण झालं. याच यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्त्रो) च्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात असं म्हटलं की, 'भारताचं हे मिशन चंद्राबाबतची अनेक नवी माहिती समोर आणेल. हे मिशन भारतीय वैज्ञानिकांचे कौशल्य आणि १३० कोटी भारतीयांच्या आकांक्षा प्रदर्शित करतात.' पंतप्रधानांनी चंद्रयान लाँचिगचे फोटो देखील शेअर केले आहेत. इस्त्रोने अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कारण की, आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी आपल्या चांद्रयान-२ हे यान यशस्वीरित्या अंतराळात धाडलं. 

इस्त्रोचे संचालक के सिवन यांनी चांद्रयान-२ हे पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे पोहचल्यानंतर अंतराळ एजन्सीमधील वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. सिवन यांनी याबाबत अशी माहिती दिली की, 'रॉकेट जीएसएलव्ही मार्क 3 याने चंद्रयान-2 ला पृथ्वीच्या कक्षेमध्ये स्थापित केलं आहे. एका महिन्यापेक्षा जास्त वेळ चांद्रयान २ हे पृथ्वीच्या वेगवेगळ्या कक्षेत परिभ्रमण करणार आहे. 

पंतप्रधान मोदींनी चांद्रयान-२ च्या यशानंतर ट्वीट केलं आहे. यावेळी मोदी असं म्हणाले की, 'चंद्रयान २ च्या यशस्वी लाँचिंगने आमच्या वैज्ञानिकांची कुशलता जगाला दाखवून दिली आहे. या मिशनमुळे चंद्र आणि त्याच्या पृष्ठभागाबाबत नवी माहिती प्राप्त होणार आहे.' 

पंतप्रधान मोदी ट्वीटमध्ये असंही म्हणाले की, 'चांद्रयान 2 प्रमाणे आमचे प्रयत्न युवकांना विज्ञान आणि उच्च संशोधन आणि नवीन प्रयोगांकडे आकर्षीत करावे असे असतील. या मिशनसाठी चांद्रयान टीमला शुभेच्छा. यामुळे भारताच्या चंद्र मिशनला खूप मोठी ताकद मिळणार आहे. याशिवाय हे मिशन चंद्राबाबतची अधिक माहिती देणार आहे.'  

'चंद्रयान २ मिशन हे खास आहे कारण की, हे चंद्राच्या दक्षिण धुव्रावरील भूपृष्ठाचा अभ्यास आणि परीक्षण करणार आहे. चंद्राचा हा भाग आतापर्यंत जवळपास दुर्लक्षितच आहे. कारण की, येथे फारसे कुणी प्रयोग केलेले नाहीत. त्यामुळे या मिशनच्या माध्यमातून एक नवी माहिती आपल्याला मिळणार आहे.' तसंच पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, चांद्रयान-२ हे मिशन पूर्णत: स्वदेशी आहे. त्यामुळे ही गोष्ट प्रत्येक भारतीयाला आनंद देणारी आहे.'

चांद्रयान-२ चं ऑर्बिटर हे चंद्राभोवती परिभ्रमण करेल. तर लँडर आणि रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागाचं निरिक्षण करतील. पंतप्रधान मोदींना यावेळी असंही म्हटलं की, 'गौरवशाली इतिहासाच्या कालखंडात चांद्रयान-२ हे एक मोठं यश म्हणून पाहिलं जाईल. चांद्रयान-२ चं लाँचिग हे भारताचं अंतराळ विज्ञान क्षेत्रातील मोठं यश आहे.'   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
चांद्रयान-२ यशस्वी प्रक्षेपण: 'हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण', पंतप्रधान मोदींनी शेअर केले फोटो Description: चांद्रयान-२ आज यशस्वी प्रक्षेपण झालं. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. तसंच हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचंही म्हटलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता