पंतप्रधान मोदी SCO शिखर संमेलनासाठी बिश्केकमध्ये दाखल, या नेत्यांची घेणार भेट 

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 13, 2019 | 16:20 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (एससीओ) शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी बिश्केकमध्ये पोहोचले आहेत. या संमेलनात मोदी मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदी SCO शिखर संमेलनासाठी बिश्केकमध्ये दाखल  |  फोटो सौजन्य: ANI

बिश्केकः शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO)शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तानच्या बिश्केकला गुरूवारी (१३ जून)दाखल झाले. या बैठकीत जागतिक सुरक्षा आणि आर्थिक सहकार या मुद्द्यांवर मुख्य जोर दिला जाणार आहे. पंतप्रधान मोदी या निमित्तानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे के.शी. जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक देखील करणार आहेत. 

पंतप्रधान मोदींनी याआधीच सांगितलं होतं की, एससीओ संमेलनाच्या वेळी अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक आयोजित करण्याची योजना देखील आहे. मोदींनी म्हटलं होतं की, यात बहुपक्षीय, राजकीय, सुरक्षा, आर्थिक आणि लोकांचे आणखीन लोकांसोबत संपर्क वाढविण्यासाठी एससीओला विशेष महत्व देतो. दोन वर्षांपूर्वी एससीओचा पूर्ण सदस्य झाल्यानंतर भारताने विविध संवाद यंत्रणेमध्ये सक्रियपणे भाग घेतला आहे. मोदी म्हणाले होते की, भारतानं किर्गिज प्रजासत्ताक यांच्या अध्यक्षतेला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तसंच संमेलनात जागतिक सुरक्षा परिस्थिती, बहुपक्षीय आर्थिक सहकार, लोकांमधील कनेक्टिव्हिटी, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक महत्त्व समस्यांवर चर्चा करण्याची अपेक्षा आहे. 

मोदींनी सांगितलं होतं की, एससीओ संमेलन संपन्न झाल्यानंतर किरगिझ प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यांच्या निमंत्रणावरून मी 14 जून 2019 रोजी अधिकृत द्विपक्षीय दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि किरगिझ यांच्यामध्ये ऐतिहासिक आणि सभ्यतांच्या संबंध आहेत. दोन्ही देश पारंपारिक रूपानं जवळीक संबंध शेअर करतात. काही दिवसांपूर्वीच संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूकीसह बऱ्याच द्विपक्षीय भागात आपले संबंध विस्तृत झाले आहेत. मोदींनी सांगितलं की, द्विपक्षीय संबंधांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष जीनबेकोव्ह आणि मी संयुक्तपणे इंडो-किरगिझ बिझनेस फोरमला संबोधित करणार आहोत. या मध्य एशियाई देशाच्या भेटींमुळे एससीओच्या सदस्य देशांशी भारताचे संबंध मजबूत होतील.

गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, एससीओ संमेलनाव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय बैठक आयोजित करण्याची योजना नाही आहे. दोन देशांच्या सर्वोच्च स्थानावरील नेत्यांमध्ये द्वीपक्षीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशा कोणत्याही चर्चेचे नियोजन नसल्याचे याआधीच स्पष्ट केलं होतं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. द्विपक्षीय चर्चेचे वृत्त फेटाळून लावत रवीशकुमार म्हणाले, ‘आतापर्यंत मला मिळालेल्या महितीनुसार बिष्केक येथील परिषदेत इमरान खान यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होण्याचे कोणतेही नियोजन नाही.’

शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना २००१मध्ये करण्यात आली आहे. त्यात रशिया, कर्जिस्तान, कजाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या देशांचा समावेश होता. त्यात २०१७मध्ये भारत आणि पाकिस्तानलाही सहभागी करून घेण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पंतप्रधान मोदी SCO शिखर संमेलनासाठी बिश्केकमध्ये दाखल, या नेत्यांची घेणार भेट  Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (एससीओ) शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी बिश्केकमध्ये पोहोचले आहेत. या संमेलनात मोदी मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
Loading...
Loading...
Loading...