...म्हणून पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना केला फोन! 

Pm modi phone to vladimir putin: PM मोदी यांनी आज (२ जुलै) राशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करुन त्यांचे अभिनंदन केले. सध्याच्या घडामोडीमध्ये मोदींनी केलेला हा फोन महत्त्वाचा समजला जात आहे.

PM Modi and russian president vladimir putin
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन (फाइल फोटो)  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केला फोन
  • पंतप्रधान मोदींनी दुसर्‍या महायुद्धातील रशियाच्या विजयाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, तसंच रशियामधील घटनात्मक सुधारणांवर मतदानाची यशस्वी पूर्तता केल्याबद्दल देखील पुतीन यांचे अभिनंदन केले.
  • २०३६ पर्यंत व्लादिमीर पुतीनच राहणार रशियाचे राष्ट्राध्यक्ष

नवी दिल्ली: जगभरात सध्या अनेक मोठमोठ्या घटना घडत आहे. एकीकडे कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या रोगाने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण देखील चांगलंच ढवळून निघालं आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे जगाची अर्थव्यवस्था जवळजवळ कोलमडली आहे. दुसरीकडे चीन विरोधात सर्वच देशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. (China) अमेरिका आणि चीन यांच्यात मागील अनेक वर्षापासून ट्रेड वॉर सुरुच आहे आणि आता तर ते अत्यंत टोकाला पोहचलं आहे. तर नुकतीच भारताची कुरापत काढून चीनने आपला आणखी एक शत्रू वाढवून घेतला आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये आज आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन  (Russian President Vladimir Putin) यांची फोनवरुन झालेली चर्चा. 

पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना केलेल्या फोन आता सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या फोनवरुन चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना दुसर्‍या महायुद्धातील रशियाच्या विजयाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसंच रशियामधील घटनात्मक सुधारणांवर मतदानाची यशस्वी पूर्तता केल्याबद्दल देखील त्यांचे अभिनंदन केले. 

दरम्यान, या व्यतिरिक्त मोदी आणि पुतीन यांच्यात इतर काही चर्चा झाली का? याबाबत मात्र, काहीही समजू शकलेलं नाही. एक असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे की, मोदी यांनी पुतीन यांना केलेला फोन हा एक आंतरराष्ट्रीय डावपेचाचा देखील भाग असू शकतो. जेणेकरुन चीनला दबावात्मक शह देता येईल. सध्या भारत-चीन सीमेवर बराच तणाव सुरु आहे. १५ जूनला दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचे देखील ४३ हून अधिक सैनिक ठार झाले. मात्र, तरीही चीनी सैन्य सातत्याने भारतीय क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना केलेल्या फोनचं महत्त्व अधिक अधोरेखित होतं 

भारत आणि रशिया यांचे पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. सध्याच्या वातावरणात हे संबंध आणखी दृढ व्हावेत असाच पंतप्रधान मोदींचा देखील प्रयत्न आहे. 

२०३६ पर्यंत पुतीनच राहणार रशियाचे राष्ट्राध्यक्ष!

रशियाच्या (Russia) राष्ट्राध्यक्षपदावर व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांना २०३६ पर्यंत कायम राहण्यासाठी मतदारांनी घटनेतील दुरुस्तींना मान्यता दिली आहे. यासाठी आठवड्याभर सुरु असलेल्या जनमत चाचणीचं काम बुधवारी पूर्ण झालं. यामुळे पुतीन यांचा आणखी १६ वर्ष राष्ट्राध्यक्ष पदावर कायम राहण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. (President until 2036) जनमत चाचणीत भाग घेतलेल्या सुमारे ७७ टक्के लोकांनी घटना दुरुस्तीच्या बाजूने मतदान केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी