Mob Lynching: मॉब लिंचिंगवरून पंतप्रधान विरोधकांवर भडकले; झारखंडची बदनामी करू नका!

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 26, 2019 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mob Lynching: मॉब लिचिंगवरून विरोधीपक्षांनी सरकारवर टीका केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना प्रत्युत्तर दिले. संपूर्ण झारखंडला बदनाम करणं योग्य आहे का?, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला आहे.

PM Narendra Modi
मॉब लिचिंगवर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली : देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांमुळं चिंता व्यक्त होत असताना, संसदेच्या अधिवेशनातही मॉब लिंचिंगचा विषय चर्चेला आहे. विरोधीपक्षांनी सरकार जोरदार टीका केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. या घटना दुःख आहेत. वेदनादायी आहेत. पण, या एका घटनेवरून संपूर्ण झारखंड राज्याची बदनामी करणं योग्य आहे का? दहशतवादाचे गुड आणि बॅड असे वर्गीकरण करता येणार नाही. कारण त्या दोन्हीमध्ये कोणतेही अंतर नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही हिंसेला समान तराजूमध्येच पाहिले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘झारखंडमध्ये झुंडशाही हिंसेचे केंद्र बनल्याचे बोलले जात आहे. माझ्यासह सगळ्यांना त्या तरुणांच्या मृत्यूचं दुःख आहे. यातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण, त्यासाठी संपूर्ण झारखंडला बदनाम करणं योग्य आहे का?’

सगळ्यांना एकच न्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जसं आपल्याला चांगल्या आणि वाईट दहशतवाद असं वर्गीकरण करता येत नाही. तसच आपल्याला झारखंड, बंगाल, केरळ जिथं जिथं हिंसेच्या घटना होतात, त्यांना एकाच मापदंडाने तोलले पाहिजे. यातून गुन्हेगारांना देश तुमच्या विरोधात आहे. हा संदेश दिला जाईल.’ आसाममध्ये एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) लागू करण्याचे क्रेडिट काँग्रेसचं आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘आसाममधील एनआरसीचं श्रेय काँग्रेसचं आहे. राजीव गांधी यांच्या पंतप्रधान काळात याबाबत निर्णय झाला होता. आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितले म्हणून आम्ही लागू करत आहे. तुम्हीही त्याचे श्रेय घ्या. मतेही घ्या आणि श्रेयही घ्या.’ अर्धे बोलायचे आणि अर्धे बोलायचे नाही, असे करून नका, असा टोला पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लगावला.

आसाममध्ये एनआरसीवाद

काही दिवसांपूर्वी आसाम सरकारने एनआरसीमधून सवलत मिळालेल्या एक लाख २ हजार नागरिकांची यादी प्रसिद्ध केली होती. यात अशा लोकांची नावं आहेत ज्यांची नावं या ड्राफ्टमध्ये सामील करण्यात आली आणि त्यानंतर ते अपात्र ठरले. यात अपात्र ठरलेल्या सगळ्यांना पत्र पाठवून त्यांना त्याची माहिती देण्यात येणार आहे. सगळ्यांना त्यासाठी दावा दाखल करण्याचा अधिकार आहे आणि ते तसं करू शकतात. सरकारकडून एनसीआरची शेवटची यादी येत्या ३० जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. हा मुद्दा विरोधकांनी संसदेत उपस्थित केला होता. त्यावर आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Mob Lynching: मॉब लिंचिंगवरून पंतप्रधान विरोधकांवर भडकले; झारखंडची बदनामी करू नका! Description: Mob Lynching: मॉब लिचिंगवरून विरोधीपक्षांनी सरकारवर टीका केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना प्रत्युत्तर दिले. संपूर्ण झारखंडला बदनाम करणं योग्य आहे का?, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles