​Times Now Summit 2020: टीका नकोशी नाही आहे, पण विरोध करणाऱ्या जबाबदारी जाणावी - पंतप्रधान मोदी

  टाइम्स नाऊ समिट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्यांच्या मुद्द्यांवर भर दिला. पुढील १० वर्षांचा अॅक्शन प्लान केंद्र सरकारच्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले. 

pm narendra modi to address times now summit in marathi tsum 1
​Times Now Summit 2020: सामन्यांचा आवाज ऐकून सुरू भारताचा अॅक्शन प्लान - पंतप्रधान मोदी  

  नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी Times Now Summit 2020 मध्ये सांगितले की, जगातील सर्वात तरूण देश आता खेळण्यासाठी तयार आहे. सरकारने या देशातील सामान्य व्यक्तीचे आवाज ऐकला आहे. यासह त्यांनी आतापर्यंत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची यादीच बोलून दाखवली. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने तीन तलाक, कलम ३७०, सीएए सारख्या मोठ्या विषयांवर निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशासमोर अनेक आव्हाने आहेत. पण आम्हांला आशा आहे, की पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था निश्चित करून दाखवणार आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या ७० वर्षात आपला देश ३ ट्रिलियनची अर्थव्यवस्था झाला आहे. पण त्यावेळी लक्ष्य नव्हते. त्यावेळी कोणी प्रश्न विचारले नाही. पण आता लक्ष्य निश्चित झाले तर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आम्ही मोठे निर्णय घेत आहेत तर प्रश्न उपस्थित होत आहेत, पण असे असताना आम्ही ध्येय पूर्ण करणार आहोत. 

 

 

आज देशात होत असलेल्या परिवर्तनाने समाजच्या प्रत्येक स्तरावर नवीन उर्जेचा संचार करत आहे. त्यात आत्मविश्वास भरला आहे. आज देशातील गरिबामध्ये आत्मविश्वास येत आहे की तो आपला जीवन स्तर सुधारू शकतो. आपली गरीबी दूर करू शकतो.  आज देश दशकांपूर्वीच्या जुन्या समस्यांवर तोडगा काढून २१ व्या शतकाकडे वेगाने वाटचाल करत आहे. जगातील सर्वात युवा देश ज्या गतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने आपण करत आहे. 
 

इन्कम टॅक्स संदर्भात पीएम मोदींनी केले आवाहन 

पाच लाखांपर्यंत इन्कमवर झिरो टॅक्सचा लाभ  घेणारे छोट्या शहरातील अनेक जण आहे. MSME  ला वाढविण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ छोट्या शहरातील उद्योजकांना सर्वाधिक आहे. गेल्या पाच वर्षात देशात १.५ कोटींपेक्षा जास्त कार विकल्या गेल्या आहेत. तीन कोटींपेक्षा जास्त भारतीय बिझनेसमन कामासाठी फिरायला परदेशात गेले आहेत. पण १३० कोटींपेक्षा जास्त देशात केवळ १.५ कोटी लोकच इन्कम टॅक्स भरतात. हे खेदजनक आहे. यावर कोणी विश्वास ठेऊ शकेल का की इतकेच लोक करपात्र आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...