Drone Festival India 2022: आज भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन करणार PM मोदी 

लोकल ते ग्लोबल
Updated May 27, 2022 | 10:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Drone Festival India 2022 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील प्रगती मैदानामध्ये भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन उत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

PM Narendra Modi will inaugurate India's largest drone festival at Pragati Maidan in Delhi today
आज सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन करणार PM मोदी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन करणार PM मोदी.
  • दिल्लीतील प्रगती मैदानामध्ये असणार कार्यक्रम.
  • भारत ड्रोन महोत्सव २०२२ हा दोन दिवसांचा कार्यक्रम आहे, जो २७ आणि २८ मे रोजी आयोजित केला जात आहे.

Bharat Drone Mahotsav। नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील प्रगती मैदानामध्ये भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन उत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान शेतकरी ड्रोन वैमानिकांशी संवाद साधतील, ओपन एअर ड्रोन उड्डाण प्रात्यक्षिके पाहतील आणि ड्रोन प्रदर्शन केंद्रात स्टार्ट-अपशी संवाद साधतील. या दरम्यान पंतप्रधान शेतकरी ड्रोन चालकांशी संवाद साधतील आणि ड्रोन ऑपरेशनचे साक्षीदार देखील होतील. (PM Narendra Modi will inaugurate India's largest drone festival at Pragati Maidan in Delhi today). 

अधिक वाचा : RR vs RCB, Qualifier 2: आज टॉस ठरवणार फायनलचे तिकीट? पाहा काय सांगते दोन्ही संघाची आकडेवारी

दोन दिवसांचा कार्यक्रम 

भारत ड्रोन महोत्सव २०२२ हा दोन दिवसांचा कार्यक्रम आहे, जो २७ आणि २८ मे रोजी आयोजित केला जात आहे. सरकारी अधिकारी, परदेशी मुत्सदी, सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खाजगी कंपन्या आणि स्टार्ट-अप इत्यादींसह १६०० हून अधिक प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात ७० हून अधिक प्रदर्शक ड्रोनच्या विविध उपयोगांची माहिती देणार आहेत.

दरम्यान, या महोत्सवात ड्रोन पायलट प्रमाणपत्रांचे वर्चुअल वितरण, उत्पादन लॉंच, पॅनेल चर्चा, उड्डाण प्रात्यक्षिके, मेड इन इंडिया ड्रोन टॅक्सी प्रोटोटाइपचे प्रदर्शन अशा इतर कार्यक्रमांचाही समावेश आहे. तसेच मेड इन इंडिया ड्रोन टॅक्सीची प्रतिकृती प्रदर्शनादरम्यान प्रदर्शित करण्यात येणार आहे.

ड्रोनच्या ट्रेंडमध्ये सातत्याने वाढ

अलीकडेच केंदीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले होते की, 'ड्रोन पायलट ट्रेनिंग कोर्स'ची फी येत्या तीन-चार महिन्यांत कमी केली जाणार आहे. ते म्हणाले होते की, हा कोर्स करणाऱ्या संस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे, त्यामुळे प्रशिक्षण शुल्क कमी होईल. गेल्या पाच महिन्यांत विमान वाहतूक नियामक DGCA ने ड्रोन पायलटनांना प्रशिक्षण देण्यासाठी २३ संस्थांना मान्यता दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी