5G in India : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार 5G लॉन्च, या शहरांमध्ये सुरू होणार सेवा

5G in India : भारतात आज 5G सेवा सुरू होणार आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा लॉन्च होणार आहे. आज पंतप्रधन मोदी भारतीय मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवा लॉन्च करणार आहेत, यासोबतच भारतात मोबाईल काँग्रेसही सुरू होणार आहे. 

5G in india
५ जी सेवा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतात आज 5G सेवा सुरू होणार आहे.
  • पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा लॉन्च होणार आहे.
  • आज पंतप्रधन मोदी भारतीय मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवा लॉन्च करणार आहेत.

5G in India : नवी दिल्ली : भारतात आज 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा लॉन्च होणार आहे. आज पंतप्रधान मोदी भारतीय मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवा लॉन्च करणार आहेत, यासोबतच भारतात मोबाईल काँग्रेसही सुरू होणार आहे.

अधिक वाचा : रुग्णवाहिकेसाठी PM मोदींनी थांबवला त्यांचा ताफा, पाहा व्हिडिओ


आज 1 ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा कार्यक्रम 4 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. फक्तच 5Gच नव्हे तर या कार्यक्रमात इतर इव्हेंट्सही अणार आहे. आज सकाळी 10  वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी 5G सेवा लॉन्च करणार आहेत. या वेळी जियो आणि एअरटेलही या दोन टेलिकॉम कंपन्याही आपली 5G सेवा ग्राहकांसाठी सुरू करणार आहे. 


जियोचे नियोजन

या वर्षी जियोची वार्षिक बैठक पार पाडली. दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबईसह इतर मेट्रो शहरात 5G लॉन्च होईल अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली होती. पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात संपूर्ण देशात ही 5G सेवा सुरू होणार आहे. जियोने संपूर्ण देशात 5G सेवा देण्यासाठी २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर जियोने आतापर्यंत एक हजार शहरंत 5G सेवा देण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. 

अधिक वाचा :  Rain Update : परती पावसाचा अनेक राज्यात कहर; महाराष्ट्रासह 'या' राज्यांसाठी अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

एअरटेलचीही तयारी पूर्ण

एअरटेल ग्राहकांना त्यांच्याकडे असलेल्या सिममध्येच 5G सेवा देणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. पुढील काही दिवसांतच ही सेवा ग्राहकांसाठी सुरू होईल असेही कंपनीने म्हटले आहे. 5G स्पेक्ट्रच्या लिलावात चार मोठ्या कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यात जियो, एअरटेल, व्होडाफोन आणि अदानी डेटा नेटवर्क्स या कंपन्यांचा समावेश होता. जियोने यात सर्वाधिक स्पेक्ट्रम विकत घेतले असून त्यानंतर एअरटेलने सर्वाधिक स्पेक्ट्रम विकत हेतले आहेत. वोडाफोन आयडियानेही यात मोठी गुंतवणूक केली आहे. 

अधिक वाचा :  PM Modi: देशाला मिळाली तिसरी Vande Bharat Express, पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबईसह या शहरांत सुरू होणार 5G

4G प्रमाणेच 5G सेवा सुद्धा देशात टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. देशातील 13 शहरांत ही सेवा सुरू होणार आहे त्यात राजधानी दिल्ली, गुरूग्राम, चंडीगढ, गांधीनगर, अहमदाबाद, लखनौ, बेंगळुरू, चेन्नई, जामनगर, कोलकाता, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. 5G मुळे फक्त इंटरनेट सुविधाच नव्हे तर कॉलिंग सेवाही चांगली होणार आहे. 5G मुळे कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाण कमी होईल असेही सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा : भाजप खासदाराला 3 कोटींचा गंडा, मुंबईतील व्यापाराने लावला चांगलाच चूना 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी