Murder of partner : 'या' वाक्याने आला महिलेला राग, लिव्ह-इन पार्टनरचा केला खून

आपल्या पार्टनरने बोललेले शब्द सहन न झाल्याने एका तरुणीने त्याचा खून केला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

Murder of partner
या वाक्याने राग आल्यामुळे पार्टनरचा खून  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लिव्ह इन पार्टनरच्या वाक्याने आला राग
  • गळा चिरून केला खून
  • पोलिसांनी मृतदेहासह केली तरुणीला अटक

Murder of Partner : आपल्या पार्टनरचा खून (Murder of partner) करून त्याचा मृतदेह (Dead body) एका मोठ्या बॅगेत (Suitcase) तिने भरला. ही बॅग गाडीत ठेवली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ती बाहेर पडली. पण चोराच्या मनात चांदणे, या म्हणीप्रमाणे समोर पोलीस दिसताच ती घाबरली. पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांना पाहून तिने अशी काही गाडी चालवली की पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिची गाडी थांबवत बॅग तपासली तेव्हा त्यांनाही जबर धक्का बसला.
अशी घडली घटना

प्रिती शर्मा नावाची गाझियाबादची ही महिला काही दिवसांपासून फिरोज नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इन पार्टनरशिपमध्ये राहत होती. या महिलेचं त्यापूर्वी दीपक यादव नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं. मात्र दीपकसोबत तिचं पटत नसल्यामुळे काही वर्षांपूर्वीच ती दीपकपासून दूर झाली होती. दीपकसोबतचे संबंध संपुष्टात आणून नवं आयुष्य सुरू करण्याचा विचार तिने पक्का केला होता. त्यासाठी आयुष्याचा जोडीदार म्हणून तिने फिरोजची निवड केली होती. फिरोजसोबत एका फ्लॅटवर सध्या ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. थोड्याच दिवसांत एकमेकांशी लग्न करण्याचा त्यांचा विचार होता. 

लग्नावरून झाला वाद

आपल्याला लवकरात लवकर लग्न करायचं आहे, असा हट्ट प्रितीने फिरोजकडे धरला होता. तर फिरोजला मात्र इतक्यात लग्न कऱण्याची इच्छा नव्हती. या विषयावरून अलिकडे दोघांचे सतत वाद होत होते. आपल्याला लवकरात लवकर लग्न करण्याची इच्छा असल्याचं तिने सांगितलं आणि याबाबत आपल्याला काहीही ऐकून घेण्याची इच्छा नसल्याचं प्रितीने म्हटलं. त्यावर फिरोजनेही तिची मागणी फेटाळून लावत आपल्याला लग्नच करण्याची इच्छा नसल्याचे संकेत दिले. त्यानंतर फिरोजनं म्हटलेलं एक वाक्य त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं.

अधिक वाचा - Terror Funding Case: डोडा आणि जम्मूमध्ये एनआयएचे छापे, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त

काय म्हणाला फिरोज?

आपल्याला तुझ्याशी लग्न करायचं नाही, असं सांगताना फिरोजनं प्रितीवर टीका केली. जी स्त्री तिच्या नवऱ्याची होऊ शकली नाही, ती माझी काय होईल? असं फिरोज म्हणाला.या वाक्याने प्रितीचा आत्मसन्मान कमालाचा दुखावला गेला. तिच्या रागाचा पारा चढला आणि फिरोजला अद्दल शिकवण्याचा निर्णय तिने घेतला. घरातील सुरीने तिने फिरोजवर वार केले आणि त्याचा गळा चिरून खून केला. 

अधिक वाचा - Taliban Rule : सार्वजनिक ठिकाणी हसल्याबद्दल तरुणीला तालिबानी शिक्षा, सरकारच्या वर्षपूर्तीनंतर परिस्थिती अधिकच बिकट

पुरावा मिटवण्याचा प्रयत्न

खून केल्यानंतर फिरोजचा मृतदेह तिथेच ठेऊन प्रिती घराबाहेर गेली आणि येता एक मोठी बॅग घेऊन आली. या बॅगेत तिने फिरोजचा मृतदेह भरला आणि रेल्वे स्टेशनवर जाऊन एखाद्या लांब पल्ल्याच्या रेल्वेत हा मृतदेह सोडून येण्याचा डाव आखला. आपल्या गाडीत ती बॅग ठेऊन जात असताना पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांना पाहून ती घाबरली आणि तिने रस्त्याच्या एका कडेला गाडी घातली. हा प्रकार पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गाडी थांबवून बॅग तपासली असता, त्यात फिरोजला मृतदेह आढळून आला. 

अधिक वाचा - विकृती: मित्राच्या कळपातील गायीवर मित्र करायचा Rape; रंगेहात पकडत पोलिसांनी केली अटक

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी फिरोजचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. प्रितीला पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी