संतप्त जमावाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवत मारहाण केली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

Angry mob beaten police
संतप्त जमावाची पोलिसांना मारहाण 

थोडं पण कामाचं

  • बेपत्ता मुलाचा मृतदेह आढल्याने नागरिकांचा संताप
  • पोलीस कर्मचाऱ्यांना काठीने मारहाण
  • पोलिसांना स्वसंरक्षणासाठी करावा लागला हवेत गोळीबार

पाटणा: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोलिसांनाच बंधक बनवत मारहाण केल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह शनिवारी एका नाल्यात आढळला. बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांचा संताप झाला आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाच बंधक बनवलं. तसेच त्यांना काठ्यांनी मारहाणही केली.

पीटीआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर रक्त लागलेलं आहे आणि जखमी झालेला आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या आजुबाजुला ग्रामस्थ उभे असून त्यांच्या हातात काठ्या आहेत.

पोलीस कर्मचारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते मात्र, ग्रामस्थ खूपच आक्रमक होते. ग्रामस्थ आपल्याकडील काठ्यांनी पोलिसांना मारहाण करत होते आणि जेव्हा पोलीस कर्मचारी दूर जात होते तेव्हा त्यांचा पाठलाग करत होते. 

बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी आढळल्यानंतर मुझफ्फरपूर जिल्ह्यातील औराई येथील पोलीस स्टेशनच्या बाहेर ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाच ओलीस ठेवलं आणि त्यांना जबर मारहाण केली. 

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दावा केला आहे की, काही अज्ञात नागरिकांनी तरुणाला मारहाण केली आणि त्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. तर, या तरुणाचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...