नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये पॉलिटिकल स्ट्राईक

नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये पॉलिटिकल स्ट्राईकGujarat Politics: गुजरातमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुका होण्यापूर्वी भाजपसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 

political strike in gujarat by aap arvind kejriwal said aam aadmi party increasing
नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचं पॉलिटिकल स्ट्राईक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या गुजरातमध्ये आम आदमी पार्टीची एन्ट्री
  • निवडणुकीत आम आदमी पार्टी मारणार जोरदार मुसंडी
  • ६ आणि ७ ऑगस्टला अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर

Arvind Kejriwal's AAP in Gujarat: गुजरात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या आम आदमी पक्षाने सुद्धा आता आपलं लक्ष गुजरातकडे वळवलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. (political strike in gujarat by aap arvind kejriwal said aam aadmi party increasing)

गुजरात दौरा करण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल ६ आणि ७ ऑगस्ट रोजी गुजरातचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अरविंद केजरीवाल जाहीर सभा सुद्धा घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत गुजरात सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी म्हटलं, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची लोकप्रियता वाढत आहे आणि हे पाहून भाजपला धक्का बसला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं की, "आम आदमी पक्षाची लोकप्रियता गुजरातमध्ये वेगाने वाढत आहे. यामुळे भाजप घाबरला आहे. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अमित शहा यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करणार आहे. हे खरे आहे का? भूपेंद्रभाई पटेल यांच्या कारभारावर भाजप नाराज आहे का?"

खरं तर या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार असून आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल यांनी गेल्या महिनाभरात अनेकदा गुजरातचा दौरा केला आहे.

अधिक वाचा : मोदी सरकारची देशवासियांना मोठी भेट, ५ ते १५ ऑगस्टपर्यंत सर्व ऐतिहासिक स्मारकांच्या ठिकाणी विनामूल्य प्रवेश

अरविंद केजरीवाल ६ आणि ७ ऑगस्टला गुजरातचा दौरा करणार आहेत. ६ ऑगस्ट रोजी टाऊनहॉल येथे अरविंद केजरीवाल जामनगरच्या व्यापाऱ्यांना संबोधित करतील आणि ७ ऑगस्ट रोजी छोटा उदयपूर येथे जाहीर सभेला संबोधित करतील. या दौऱ्यात अरविंद केजरीवाल मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आम आदमी पक्षाने आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० उमेदवारांची पहिली यादी तयार केली आहे. या यादीत आदिवासी, मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीच्या उमेदवारांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. भाजपशासित गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने सर्वप्रथम आपल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी