पूर्वा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 20, 2019 | 07:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

हावडा येथून दिल्लीला जाणाऱ्या पूर्वा एक्सप्रेसला अपघात झाला आहे. कानपूर पासून जवळपास १५ किलोमीटर दूर रूमा गावात हा अपघात झाला आहे.

Poorva Express derailed in Kanpur
पूर्वा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले  |  फोटो सौजन्य: ANI

कानपूर: उत्तरप्रदेशातील कानपूर जवळ पूर्वा एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. रात्री उशीरा पूर्वा एक्सप्रेसला हा अपघात घडला आहे. पूर्वा एक्सप्रेस हावडाहून दिल्लीला जात असताना रात्री एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघातात पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले आहेत. पूर्वा एक्सप्रेसला झालेल्या या अपघातात अनेक रेल्वे प्रवासी जखमी झाले आहेत.

रात्री झालेल्या या अपघातात १३ रेल्वे प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, रेल्वे अधिकारी, एनडीआरएफची टीम दाखल झाली. अपघातानंतर रेल्वेतर्फे हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केले आहेत. हावडा (०३३) २६४०२२४१, २६४०२२४२, २६४०२२४३, २६४१२६६० हे नंबर्स रेल्वेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.


घटनास्थळी ४५ सदस्यांची एनडीआरएफ टीम रेल्वे प्रवाशांच्या मतदीसाठी घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्य जोरात सुरू आहे. अद्याप या अपघातामागचं नेमकं कारण समजू शकलेले नाहीये. पूर्वा एक्सप्रेसला झालेल्या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, 'ज्यावेळी पूर्वा एक्सप्रेसला अपघात झाला त्यावेळी ट्रेनमध्ये ९०० प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पूर्वा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी Description: हावडा येथून दिल्लीला जाणाऱ्या पूर्वा एक्सप्रेसला अपघात झाला आहे. कानपूर पासून जवळपास १५ किलोमीटर दूर रूमा गावात हा अपघात झाला आहे.
Loading...
Loading...
Loading...