Porn movie seen on digital billboards at airport in Brazil : रिओ दी जनेरिओ, ब्राझिल (Rio de Janeiro, Brazil) : ब्राझिलमधील रिओ दी जनेरिओ येथील विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. विमानतळावरील डिजिटल जाहिरात फलकांवर अचानक पॉर्न फिल्म दिसू लागली. जाहिरात फलकांवर पॉर्न फिल्म दिसू लागल्याचे पाहून प्रवासी आणि विमानतळाचे अधिकारी चक्रावले.
डिजिटल जाहिरात फलकांवर पॉर्न फिल्म सुरू झाल्यावर धावपळ झाली. मुलांचे लक्ष जहिरातींच्या डिजिटल फलकांकडे जाऊ नये यासाठी पालकांना आटोकाट प्रयत्न करावे लागत होते. हे प्रयत्न सुरू असूनही अनेक मुलांनी पॉर्न फिल्म बघून पालकांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यामुळे पालकांची पंचाईत झाल्याचे चित्र विमानतळावर निर्माण झाले.
जी कंपनी विमानतळावरील डिजिटल जाहिरात फलकांचे नियंत्रण करते त्या कंपनीने परिस्थिती अनियंत्रित झाल्याचे पाहून सर्व डिजिटल फलक तातडीने बंद केले. या नंतर कंपनीने डिजिटल जाहिरात फलकांवर पॉर्न फिल्म कशी सुरू झाली याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. विमानतळ प्रशासनाने झाल्या प्रकारासाठी डिजिटल फलक हाताळणारी कंपनी दोषी असल्याचे सांगितले. तर अज्ञाताकडून हॅकिंग झाल्यामुळे जाहिरातीच्या डिजिटल फलकांवर पॉर्न फिल्म सुरू झाल्याचे कंपनीने सांगितले. हॅकिंग प्रकरणाचा शोध लावण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेत असल्याचेही कंपनीने जाहीर केले.