पोस्टमास्तरने २४ कुटुंबांचे १ कोटी रुपये IPLच्या सट्टेबाजीत बुडवले

postmaster arrested for spending small savings investors money on IPL betting : मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील बीना सब पोस्ट ऑफिसमधील पोस्टमास्तर विशाल अहिरवार याला अटक करण्यात आली आहे.

postmaster arrested for spending small savings investors money on IPL betting
पोस्टमास्तरने २४ कुटुंबांचे १ कोटी रुपये IPLच्या सट्टेबाजीत बुडवले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पोस्टमास्तरने २४ कुटुंबांचे १ कोटी रुपये IPLच्या सट्टेबाजीत बुडवले
  • कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४०८ अंतर्गत गुन्हा दाखल
  • पोस्टमास्तर विशाल अहिरवार याला अटक

postmaster arrested for spending small savings investors money on IPL betting : भोपाळ : मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील बीना सब पोस्ट ऑफिसमधील पोस्टमास्तर विशाल अहिरवार याला अटक करण्यात आली आहे. विशाल अहिरवारने आयपीएल २०२२ स्पर्धेत सट्टेबाजी करण्यासाठी सामान्य गुंतवणूकदारांनी विश्वासाने पोस्टात ठेवलेल्या एफडीमधील पैशांचा वापर केला. या प्रकरणी बीना जीआरपी तपास करत आहेत. विशाल अहिरवार विरोधात कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाअंती आणखी काही कलमे लावून पोलीस विशाल अहिरवार विरुद्धची केस आणखी बळकट करण्याची शक्यता आहे. 

विशाल अहिरवारने बनावट कागदपत्रे तयार करून पोस्टात एफडी करणाऱ्यांचे पैसे परस्पर एका खात्यात फिरवले होते. हे पैसे विशाल अहिरवार सट्टेबाजीसाठी वापरत होता. तो आयपीएलच्या काळात फँटसी लीग खेळण्यासाठी सामान्यांचा पैसा कायद्याचे उल्लंघन करून वापरत होता. धक्कादायक म्हणजे सामान्यांनी पोस्टात एफडी करून ठेवलेल्या पैशांतील सुमारे एक कोटी रुपये विशाल अहिरवारने फँटसी लीगमध्ये गमावले होते. 

सामान्य नागरिक धोका कमी, पैसे सुरक्षित राहणार याची खात्री असल्यामुळेच पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. पण पोस्ट मास्तरने पैशांचा गैरवापर केल्याचे उघड झाल्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी