Postpone NEET PG 2022: Aspirants write to Health Minister : मेडिकलच्या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट पीजी (National Eligibility cum Entrance Test for Post Graduate - NEET PG) ही परीक्षा द्यावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे नीट पीजी संदर्भातल्या बातम्यांकडे लक्ष असते. या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी.
यंदाच्या वर्षीची नीट पीजी २०२२ ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सुरू आहे. काही जणांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावरही #DeferNEETPG2022 हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
नीट पीजी २०२२ ही परीक्षा स्थगित करा अथवा पुढे ढकला अशा स्वरुपाची मागणी सुरू आहे. यंदाची नीट पीजी परीक्षा २१ मे २०२२ रोजी होणार आहे. पण नीटी पीजीसाठी होणारे काउंसलिंग ३ मे २०२२ रोजी संपणार आहे. यामुळे एवढ्या कमी कालावधीत नीट पीजी परीक्षेचे आयोजन करणे योग्य होणार नाही, असे परीक्षा स्थगित करा किंवा पुढे ढकला अशी मागणी करणाऱ्यांचे म्हणणे आहे.
नीट पीजी परीक्षा स्थगित करा किंवा पुढे ढकला अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. मागणी सुरू असली तरी अद्याप नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा किंवा स्थगित करण्याचा निर्णय झालेला नाही.