Power Crisis : 6 राज्यांवर वीजनिर्मिती आणि कोळसा कंपन्यांची 75000 कोटींची थकबाकी; जाणून घ्या महाराष्ट्राने किती थकवलं बिल

देशात वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) वीजनिर्मिती कंपन्या (Power generating companies) आणि कोळसा कंपन्यांची थकबाकी असलेल्या 6 राज्यांना इशारा दिला आहे.

Why did the central government issue a warning to six states?
केंद्र सरकारने सहा राज्यांना दिला इशारा, का दिली Warning?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सहा राज्यांची एकूण थकबाकी सुमारे 75000 कोटी रुपये.
  • वीज कंपन्या आणि कोळसा कंपन्यांची थकबाकी भरण्याची जबाबदारी राज्य सरकारची
  • तामिळनाडू सरकारकडे वीज निर्मिती कंपन्यांचे 20,842 कोटी रुपये तर कोल इंडिया लिमिटेडचे ​​729 कोटी रुपयांची थकबाकी

Power Crisis : देशात वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) वीजनिर्मिती कंपन्या (Power generating companies) आणि कोळसा कंपन्यांची थकबाकी असलेल्या 6 राज्यांना इशारा दिला आहे. या राज्यांच्या वीज कंपन्यांकडे सर्वाधिक थकबाकी आहे, या सहा राज्यांच्या मुख्य सचिवांना केंद्रीय ऊर्जा सचिवांनी (Energy Secretary) पत्र लिहिले आहे. या राज्यांनी वीज निर्मिती कंपन्यांची थकबाकी लवकरात लवकर भरावी,  असं या पत्रात सांगण्यात आले आहे.

परतफेड न केल्यास..

ऊर्जा सचिवांच्या मते, वीज कंपन्या आणि कोळसा कंपन्यांची थकबाकी भरण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यामुळे देशातील 6 राज्यांना वीज निर्मिती कंपन्यांची थकबाकी लवकरात लवकर भरण्यास सांगण्यात आले आहे. तसे न झाल्यास या राज्यांच्या वीजपुरवठ्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असे ऊर्जा सचिवांनी सांगितले. 

तामिळनाडू आणि महाराष्ट्र आहे सर्वात मोठे थकबाकीदार 

या सहा राज्यांची एकूण थकबाकी सुमारे 75000 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये तामिळनाडूची सर्वात जास्त थकबाकी आहे. राज्याकडे वीज निर्मिती कंपन्यांचे 20,842 कोटी रुपये तर कोल इंडिया लिमिटेडचे ​​729 कोटी रुपये आहेत. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राकडे वीज निर्मिती कंपन्यांचे 18,014 कोटी रुपये आणि कोल इंडिया लिमिटेडचे ​​2573 कोटी रुपये आहेत.

'या' राज्यांकडेही थकबाकी

राजस्थान सरकारकडे वीज कंपन्यांचे 11,176 कोटी रुपये आणि कोळसा कंपनीचे 307 कोटी रुपये थकीत आहेत. उत्तर प्रदेशचे वीज कंपन्यांचे 9372 कोटी रुपये आणि कोळसा कंपन्यांचे 319 कोटी रुपये आहेत. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरकडे 7,275 कोटी रुपये आणि मध्य प्रदेशकडे 5030 कोटी रुपये थकीत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी